Kitchen Tips: मिठाला ओलसरपणा सुटत असल्यास करा हा रामबाण उपाय

अनेकदा असे होते की वातावरण दमट असल्यावर घरी मीठ आणि साखरेला ओलसरपणा सुटतो. अशा वेळी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. तसेच या दिवसांत धान्य देखील खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळी मिठाच्या डब्यात कडुलिंबाची पाने ठेवण्याचा फायदा होतो. मिठाला ओलसरपणा न सुटण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

  1. कधीकधी ओलाव्यामुळे किंवा मीठ जास्त जुने झाल्यामुळे मिठात बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढू शकतात. मात्र मिठाच्या डब्यात कडुलिंबाची पाने ठेवल्याने ही समस्या होत नाही.
  2. कडुलिंबाच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे मिठात गाठी तयार होत नाहीत आणि बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढत नाहीत.
  3. याशिवाय कडुलिंबाची पाने मीठाला ओलावा शोषण्यापासून रोखतात. त्यामुळे मीठ कोरडे राहण्यास मदत होते.
  4. तसेच कडुलिंबाच्या पानांचा थोडासा कडूपणा आणि तीव्र वास देखील कीटकांना मीठापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

हे लक्षात ठेवा

  • हा उपाय करण्यासाठी कडुलिंबाची पाने कोरडी असली पाहिजेत.
  • ओली पाने मिठात टाकल्यास मीठ खराब होऊ शकते.
  • पाने धुवून उन्हात चांगली वाळवू शकता.
  • पाने पूर्णपणे सुकल्यानंतर, मिठाच्या डब्यात ठेवा.

Comments are closed.