Mumbai Monsoon : पोलीस बनले पालक, स्कुलबसमधून विद्यार्थ्यांची केली सुटला
मुंबई : हवामान विभागाने मुंबई, ठाण्याला 48 तासांचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 48 तास मुंबईसाठी महत्त्वाचे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई आणि राज्याचा आढावा घेतला जात आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. कारण मुंबईत जागोजागी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. किंग्ज सर्कल येथे साचलेल्या पावसाच्या पाण्यात एक स्कूलबस अडकडून पडली होती. यावेळी काही पोलीसांनी पालक बनत लहानग्या विद्यार्थ्यांना स्कुलबसमधून उचलून पोलीस ठाण्यात घेऊन जातानाचे दृष्य पाहायला मिळाले.
Comments are closed.