बदलत्या वातावरणात सर्दीचा त्रास? रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या हे सूप

पावसाळा सर्वाना हवाहवासा वाटला तरी या वातावरणात सतत आजारपणाचा धोका असतो. त्यात गेले दोन ते तीन दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्याने सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हेल्दी सूप पिऊ शकता. आजच्या लेखात जाणून घेऊयात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते सूप पिता येतील.

मिक्स व्हेजिटेबल सूप –

साहित्य –

  • कांदा – 1
  • गाजर – 1
  • टोमॅटो – 1
  • सिमला मिरची- 2
  • कोबी – 1/2 कप
  • आले लसूण पेस्ट – 1 चमचा
  • लिंबाचा रस – 2 चमचे
  • काळे मीठ
  • काळी मिरी – 1 चमचा

कृती –

  • सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.
  • कढईत ऑलिव्ह ऑइल टाका.
  • यानंतर आले लसूण पेस्ट टाकून 2 मिनिटे परतून घ्यावी.
  • चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला.
  • यानंतर कोबी, बीन्स, सिमला मिरची घालून पुन्हा परतून घ्या.
  • भाज्या शिजत आल्यावर त्यात 2 ग्लास पाणी टाकून एक उकळी आणा.
  • यानंतर काळी मिरी, काळे मीठ घाला.
  • अशा पद्धतीने तयार झाले आहे मिक्स व्हेजिटेबल सूप.

गुन्हा मॅश्रम सूप –

साहित्य –

  • मशरूम- 10 ते 12
  • मलई – 1/2 कप
  • कॉर्न फ्लॉवर – 1 चमचा
  • कांदा – 1
  • आले लसूण पेस्ट – 1 चमचा
  • ऑलिव्ह ऑइल – 2 चमचा
  • काळी मिरी – 1 चमचा
  • काळे मीठ

कृती –

  • सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.
  • आता एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल घाला.
  • यानंतर आले लसूण पेस्ट, कांदा घालून परतून घ्यावा.
  • 2 ते 3 मिनिटांनी मशरूम घालून शिजवून घ्यावे.
  • यात 2 ग्लास पाणी घाला आणि उकळी आणा.
  • मध्यम आचेवर 5 मिनिटे शिजल्यावर काळी मिरी आणि काळे मीठ घाला.
  • यानंतर सूपमध्ये 2 चमचे कॉर्न फ्लॉवर सूपमध्ये मिसळा.
  • क्रीमही सूपमध्ये घाला.
  • सतत ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
  • अशा पद्धतीने तयार झाले आहे मशरुम सूप.

गोड कॉर्न सूप –

साहित्य –

  • गोड कॉर्न – 2 कप
  • कांदा – 2
  • सोयाबीनचे – 1/2 कप
  • आले लसूण पेस्ट – 1 चमचा
  • काळी मिरी – 1 चमचा
  • काळे मीठ –

कृती –

  • कॉर्न शिजवून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.
  • यानंतर एका पॅनमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल टाका.
  • तेलात आले लसूण पेस्ट, कांदा परतून घ्यावे.
  • कांदा मऊ झाल्यावर कॉर्न पेस्ट परतून घ्यावी.
  • यानंतर 2 ग्लास पाणी मिश्रणात घाला आणि 10 मिनिटे शिजू द्यावे.
  • यानंतर काळे मीठ आणि काळी मिरी घाला.
  • अशा पद्धतीने तयार झाले आहे स्वीट कॉर्न सूप.

 

हेही वाचा – किती महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करावी?

Comments are closed.