ताण टाळणं शक्य नाही, पण त्याला हाताळायला शिकणं गरजेचं, वाचा एक्सपर्टसचा सल्ला
आधुनिक जीवनशैलीत ताण (Stress) हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झाला आहे. करिअर, नोकरी, नातेसंबंध, आर्थिक जबाबदाऱ्या आणि सतत बदलणारं समाजजीवन यामुळे ताण वाढतोच. मात्र, ताणापासून पूर्णपणे पळ काढणं शक्य नाही. “मानिनी’ला दिलेल्या मुलाखतीत अदिती सुराणा म्हणाल्या की, ताण हा शत्रू नाही. तो पूर्ण टाळण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याला योग्य प्रकारे हाताळायला शिकणं गरजेचं आहे.” (Stress management tips in Marathi)
अनेकांना वाटतं की ताण म्हणजे नकारात्मक गोष्ट, पण खरं तर तो आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. “मानिनी’ला दिलेल्या मुलाखतीत अदिती सुराणा म्हणाल्या की, छोट्या प्रमाणातला ताण आपल्याला जागृत ठेवतो, कामाकडे लक्ष केंद्रीत करायला मदत करतो. समस्या तेव्हा होते जेव्हा ताण दीर्घकाळ टिकतो आणि आपण त्याला हाताळत नाही.”
- ताणावर नियंत्रण मिळवण्याचे उपाय
1) श्वसनाच्या पद्धती – खोल श्वास घेणं ही ताण कमी करण्याची सोपी पद्धत आहे.
2) लेखन – मनातील विचार लिहून काढल्याने ताण हलका होतो.
3) शरीराला हलवणं – चालणे, व्यायाम, योगा यामुळे शरीरातील तणाव सुटतो.
4) कामाची प्राधान्यक्रमानं यादी – ताणाचा मोठा भाग हा अनियोजित कामामुळे निर्माण होतो. योग्य प्लॅनिंगने तो कमी होतो. - माईंडफुलनेसची गरज
आपल्याला जेव्हा जेव्हा ताण जाणवतो, तेव्हा स्वतःला थांबवून त्या क्षणाचं भान ठेवणं हे महत्त्वाचं आहे. “मानिनी’ला दिलेल्या मुलाखतीत अदिती सुराणा म्हणाल्या की, माईंडफुलनेसचा सराव केल्याने मन शांत राहतं आणि ताणाचं परिणामकारक व्यवस्थापन करता येतं. - तरुणाईसमोरचं आव्हान
सोशल मीडियाच्या दडपणामुळे, करिअरबाबतच्या अपेक्षांमुळे आणि स्पर्धेमुळे तरुणाईत ताण अधिक दिसतो. या पिढीने ताणापासून पळ काढण्याऐवजी त्याला कसं हाताळायचं हे शिकलं, तर त्यांचा आत्मविश्वास दुप्पट होईल.
ताण पूर्णपणे नाहीसा करणे शक्य नाही, पण त्याला हाताळण्याची शिस्त लावणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. “मानिनी’ला दिलेल्या मुलाखतीत अदिती सुराणा म्हणाल्या की, ताण म्हणजे अडथळा नव्हे, तो योग्यरीत्या हाताळला तर तोच आपल्या प्रगतीचा आधार होऊ शकतो.”
Comments are closed.