मांजराच्या सुवसातून तयार होतो महागडा परफ्युम, जाणून घ्या कसा बनतो हा खास सुगंध

आपल्यापैकी अनेकांना महागडे परफ्युम लावण्याचा शौक असतो. काहींना कपडे, तर काहींना गॅजेट्स आवडतात, पण परफ्युम हा असा शौक आहे ज्यासाठी लोक हजारो रुपये मोजायला तयार असतात. विशेष म्हणजे जगभरात एक असा परफ्युम आहे, जो सामान्य फुलांच्या किंवा हर्ब्सच्या सुगंधापासून नव्हे तर एका प्राण्याच्या विशेष सुगंधी पदार्थापासून तयार होतो. (civet cat perfume price and making)

मांजरासारखा दिसणारा “सिवेट” प्राणी

हा परफ्युम “सिवेट” नावाच्या प्राण्याच्या मदतीने बनवला जातो. सिवेट हा दिसायला मांजरासारखा असतो आणि त्याच्या शरीराच्या एका ग्रंथीतून एक सुगंधी पदार्थ बाहेर पडतो. हाच घटक परफ्युम बनवण्यासाठी वापरला जातो.

परफ्युम तयार करण्याची प्रक्रिया

  1. पूर्वी या प्राण्यापासून थेट हा पदार्थ काढला जायचा. मात्र त्यामुळे प्राण्याला त्रास व्हायचा. आता मात्र हा सुगंधी पदार्थ कृत्रिम पद्धतीने (synthetic) तयार केला जातो.
  2. हा घटक स्वच्छ करून वाळवला जातो.
  3. त्यानंतर विविध सुगंधी तेलं आणि नैसर्गिक पदार्थांसोबत मिसळून खास मिश्रण तयार केलं जातं.
  4. अनेकदा टेस्टिंग आणि सुधारणा करून टिकाऊ सुगंध असलेला परफ्युम तयार होतो.
  5. शेवटी आकर्षक बाटल्यांमध्ये भरून तो बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला जातो.

किंमत किती असते?

सिवेटपासून बनलेले अस्सल परफ्युम अतिशय महाग असतात. त्यांची किंमत 5000 रुपयांपासून थेट 20,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर कृत्रिम (synthetic) सिवेट असलेल्या परफ्युमची किंमत साधारण 1,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान असते. त्यामुळे हा परफ्युम  महागडा मानला जातो.

(टीप: या लेखात दिलेली माहिती विविध माध्यमांतून उपलब्ध झालेल्या अहवालांवर आधारित आहे. परफ्युम बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांची पद्धत किंवा त्यांची अचूकता याबाबत My Mahanagar कोणतीही हमी देत नाही. हा लेख केवळ माहितीपर उद्देशासाठी आहे.)

Comments are closed.