गरम पेयांमुळे कर्करोगाचा धोका? वाचा संशोधन काय सांगतंय

भारतीय आणि चहा जणू एक समीकरणच आहे. अनेक भारतीयांची सुरुवात सकाळच्या चहा कॉफीने होते. तुमची देखील होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार असे सांगण्यत आले आहे की खूप जास्त गरम पेय जसे की चहा आणि कॉफी प्यायल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. नक्की या संशोधनात आणखी काय सांगण्यात आले आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे,

संशोधन काय सांगते ?

नुकत्याच करण्यात आलेल्या या संशोधनात असे आढळून आले आहे की, खूप जास्त गरम पेये प्यायल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक दिवसातून आठ किंवा त्याहून अधिक गरम चहा, कॉफी पितात त्यांना गरम पेय न पिणाऱ्या लोकांपेक्षा हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. जवळपास सहा पट जास्त.

उच्च तापमानात पेय पिणं हे लाकूड जाळल्यावर त्यातून निघणाऱ्या धुराइतके हानिकारक आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कर्करोगाचा धोका तुम्ही एकाच वेळी किती गरम पेय पिता आणि किती लवकर पिता यावर अवलंबून असतो.

कुठे संशोधन करण्यात आले ?

सिडनी विद्यापिठाने हे संशोधन करण्यात आले आहे. सिडनी विद्यापीठाने देशातील सुमारे अर्धा दशलक्ष प्रौढांवर केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे.

गरम पेयामुळे कर्करोग कसा होतो ?

जेव्हा तुम्ही खूप जास्त गरम पेय पिता तेव्हा अन्ननलिकेच्या आतील पेशींना नुकसान होते आणि हळूहळू याचे रूपांतर कर्करोगात होते.

गरम पेये कसे प्यावे?

  • गरम पेये हळूहळू प्यावेत.
  • किंवा त्यावर फुंकर घालून कोमट करून प्यावेत.
  • याशिवाय पेय पिताना लहान घोट घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला.

हेही पाहा – नाश्त्यातील या पदार्थाने वाढतो हृदयविकाराचा धोका

Comments are closed.