या ठिकाणी बाराही महिने पडतो पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने हाहा:कार माजवला आहे. सर्व ठिकाणे जलमय झाल्याने कामावर निघालेल्या आणि पाण्याच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना विविध समस्यांचा त्रास सहन करावा लागला. पावसामुळे अनेकांचे हालही झाले. फक्त दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे मुंबईचीकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पण, तुम्हाला हे माहीत आहे का, जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे वर्षभर पाऊस पडतो. चला तर मग जाणून घेऊयात , ही ठिकाणे कोणती आहेत.

मावसिनराम आणि चेरापुंजी , मेघालय –

मेघालयमधील मावसिनराम आणि चेरापुंजी येथे वर्षाच्या बाराही महिने पाऊस पडतो. हे ठिकाण केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वाधिक दमट भाग असणारे ठिकाण आहे. येथे सुमारे 11,872 मिमी पाऊस पडतो. वर्षाच्या बाराही महिने येथे तुम्हाला छत्री घेऊन फिरावे लागते. येथे 1491 मीटर उंचीच्या खासी टेकड्यांवर आदळणाऱ्या मान्सून वाऱ्यांमुळे जवळपास प्रत्येक महिन्यात येथे मुसळधार पाऊस पडतो. सतत बरसणाऱ्या पावसामुळे सूर्यदर्शन मात्र येथे क्विचतच घडते.

चिखल, एअर अमेरिका –

अमेरिकेतील सर्वांधिक पावसाळी शहरांपैंकी एक असणारे हिलो, हवाई हे एक शहर आहे. वादळी वारे आणि ज्वालामुखी पर्वतांमुळे येथे वर्षाच्या बाराही महिने पाऊस पडतो.

डेबुंडशा, आफ्रिका –

माउंट कॅमेरूनच्या पायथ्याशी हे गाव वसलेले आहे. येथे अटलांटिक महासागरातून येणाऱ्या ओलसर वाऱ्यांमुळे या प्रदेशात वर्षभर पावसाळी वातावरण असते. जवळजवळ येथे दररोज थोडा तरी पाऊस पडतो, असे सांगितले जाते.

तुतुनेंडो, कोलंबिया –

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशातील टुटुनेन्डो येथे वर्षभर पाऊस पडतो. येथे तुम्ही छत्रीशिवाय घराबाहेर पडू शकत नाही. येथील लोक पावसासोबत आपले दररोजचे जीवन जगतात.

 

हेही वाचा :

Comments are closed.