Bra म्हणजे नक्की काय? फुलफॉर्म जाणून तुम्हीही थक्क व्हाल

आजच्या काळात फॅशन, स्टाईल आणि कम्फर्ट यांना सगळ्यांत जास्त महत्त्व मिळतं. महिलांसाठी त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रा (Bra). अनेक वेळा या विषयावर खुलेपणाने बोलणं टाळलं जातं, पण खरा विचार केला तर ब्रा हा केवळ एक कपडा नसून आराम, आरोग्य आणि आत्मविश्वासाचा संगम आहे. शरीराला योग्य आकार देणं, पाठीवरील ताण कमी करणं आणि दैनंदिन आयुष्यात आराम देणं या सगळ्या गोष्टींसाठी ब्रा महत्त्वाची ठरते. पण प्रश्न असा की, ब्रा या शब्दाचा खरं तर अर्थ आणि फुलफॉर्म काय आहे? चला तर जाणून घेऊया.(bra full form facts for women)

ब्रा शब्दाची सुरुवात कशी झाली?

‘ब्रा’ हा शब्द फ्रेंच भाषेतल्या Brassiere या शब्दावरून आला आहे. सर्वप्रथम 1883 मध्ये याचा उल्लेख एका वृत्तपत्रात झाला. नंतर 1907 मध्ये एका प्रसिद्ध फॅशन मॅगझिनमध्ये हा शब्द झळकला आणि महिलांमध्ये हळूहळू लोकप्रिय झाला. पुढे हा शब्द छोटा करून Bra असा वापरला जाऊ लागला. याचा फुलफॉर्म आहे – Breast Resting Area (ब्रेस्ट रेस्टिंग एरिया).

कप साइजची ओळख

सुरुवातीला ब्रा एका ठराविक साईजमध्येच उपलब्ध होती. मात्र 1930 च्या दशकात कप साइज A ते D अशी विभागणी करण्यात आली. यामुळे महिलांना त्यांच्या शरीररचनेनुसार आणि कम्फर्टनुसार योग्य साईज निवडणं सोपं झालं.

ब्रा किती काळ वापरावी?

इतर कपड्यांप्रमाणेच ब्राचीही शेल्फ लाइफ असते. साधारण 6 ते 9 महिन्यांनंतर ब्रा बदलणं योग्य ठरतं. जुन्या ब्राचा इलास्टिक हळूहळू सैल होतो, त्यामुळे शरीराला मिळणारा सपोर्ट कमी होतो. शिवाय, दीर्घकाळ घट्ट किंवा जुनी ब्रा वापरल्यास छातीच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

ब्रा ही फक्त एक फॅशन आयटम नसून महिलांच्या आरोग्याशी आणि आत्मविश्वासाशी थेट जोडलेली आहे. त्यामुळे योग्य साईज, योग्य फिटिंग आणि योग्य वेळी बदल याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. ब्रा हा महिलांसाठी दैनंदिन जीवनातील एक गुपित पण महत्त्वाचा साथीदार आहे असं म्हणायला हरकत नाही.

Comments are closed.