सौंदर्य खुलण्यासाठी अनेक अभिनेत्री करतात ही वेदनादायी थेरेपी
अभिनेत्री म्हटलं की त्यांच्या सौंदर्याची चर्चा सुरू होते. चाहत्यांना त्यांची गोरी, नितळ त्वचा आणि मोहक अदा कायमच भावतात. मात्र हे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्या कोणते उपाय करतात, याची माहिती अनेकांना नसते. आज आपण अशाच एका पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत जी वेदनादायी असूनही अनेक अभिनेत्री वापरतात कपिंग थेरेपी. (beauty benefits of cupping therapy for women)
कपिंग थेरेपी म्हणजे काय?
कपिंग थेरेपी ही प्राचीन चायनीज पद्धत आहे. यात काचेचे छोटे कप किंवा ग्लास त्वचेवर ठेवले जातात. त्याआधी या कपांमध्ये आग विझवून उष्णता निर्माण केली जाते. गरम झालेला कप त्वचेवर ठेवला की त्या ठिकाणी व्हॅक्यूम तयार होतो. या प्रक्रियेमुळे त्वचेखालचे स्नायू आणि ऊतकांवर ताण येतो आणि शरीरातील अशुद्धता बाहेर पडते, असे मानले जाते.
कपिंग थेरपचा फायदे:
1) वेदना कमी करणे
मानदुखी, पाठदुखी किंवा स्नायू दुखण्यावर कपिंग थेरेपी उपयुक्त मानली जाते.
2) रक्ताभिसरण सुधारते
ही थेरेपी शरीरातील रक्ताभिसरण वेगवान करते. त्यामुळे पेशींना आणि अवयवांना जास्त ऑक्सिजन मिळतो.
3) तणाव कमी होतो
स्नायू शिथिल झाल्यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि तणाव दूर होतो.
4) रोगप्रतिकारशक्ती वाढते
काही संशोधनानुसार, नियमित कपिंग थेरेपीमुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट होण्यास मदत होते.
5) त्वचेची देखभाल
मुरुम, डाग किंवा त्वचेवरील काही समस्या कमी करण्यासाठीही या पद्धतीचा वापर केला जातो.
कपिंग थेरपचे प्रकार:
1) ड्राय कपिंग (Dry Cupping): यात फक्त कप त्वचेवर ठेवून व्हॅक्यूम तयार केला जातो.
2) वेट कपिंग (Wet Cupping): यात त्वचेवर हलके चीरे देऊन रक्त बाहेर काढले जाते आणि त्यानंतर कप लावले जातात.
कपिंग थेरेपी ही वेदनादायी असली तरी अनेक अभिनेत्री आणि सेलिब्रिटी ही थेरेपी वापरतात. सौंदर्य टिकवून ठेवणे, शरीराला आराम देणे आणि त्वचेचा तजेला वाढवणे या कारणांसाठी ही पद्धत लोकप्रिय होत आहे. मात्र कोणतीही थेरपी करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
Comments are closed.