पुरुषांच्या तुलनेत महिलांचे वजन लवकर कमी का होत नाही?

हल्ली आरोग्याच्याबाबतीत सर्वांना सामान्यपणे जाणवणारी समस्या म्हणजे वाढते वजन. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कोणी डाएट, जीम, कोणी योगासनं करत आहे. कोणाला वजन कमी करण्यात यश येतंय तर कोणाला अपयश. असे सर्व असले तरी तुम्हाला हे माहीत आहे का? पुरुषांच्या तुलनेत महिलांचे वजन लवकर कमी होत नाही. महिलांना वजन कमी करण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि अधिक मेहनतही घ्यावी लागते. पण, असे का होते? आजच्या लेखातून जाणून घेऊयात सविस्तरपणे,

यबर्टी –

पुरुष आणि स्त्रियांच्या शरीराची रचना वेगवेगळी असते. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे वजन अधिक वेगाने वाढते. यामागे प्युबर्टीचे कारण सांगितले जाते. प्युबर्टीमुळे बहुतांश मुलींचे वजन वाढलेले दिसते. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजन कमी करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.

स्नायू –

पुरुषांमध्ये जास्त स्नायू असल्याने महिलांच्या तुलनेत लवकर कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी महिलांना अधिक मेहनत घ्यावी लागते.

चयापचय दर –

महिलांमध्ये मेटाबॉलिजम रेट कमी असल्याने पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कमी प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे महिलांना वजन कमी करणे अधिक चॅलेजिंग ठरते.

फॅट स्टोरेज कॅपेसिटी –

पुरुष आणि महिलांमध्ये फॅट डिस्ट्रिब्युशन आणि स्टोरेज कॅपेसिटी वेगवेगळी असते. पुरुषांमध्ये पोटाच्या आसपास फॅट वाढतात तर महिलांमध्ये मांड्या आणि हिप्स येथे फॅट्स वाढतात. तज्ञांच्या मते, मांड्या आणि हिप्सचे फॅट लवकर बर्न होत नाही. त्यामुळे महिलांना वजन कमी करण्यासाठी वेळ लागतो.

हार्मोनल बदल –

मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती दरम्यान महिलांना अनेक हार्मोनल बदलावमधून जावे लागते. या सर्वांच्या शरीरातील फॅट्स कमी होण्यावर विपरित परिणाम होतो. ज्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया मंदावते.

 

हेही पाहा –

Comments are closed.