हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर का देतात? पाहा कारण काय..
हॉटेल असो किंवा रेस्टॉरंट जेवण झाल्यानंतर बिलासह बडीशेप आणि खडीसाखर दिली जाते. प्रत्येकालाच ते खायला आवडते. पण तुम्हाला माहित आहे का? बडीशेप आणि खडीसाखर देण्यामागे प्रमुख कारणे आहेत. आपल्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर असते. ती कारणे नेमकी कोणती ते जाणून घेऊया…
पचनक्रिया सुधारते
आता बऱ्याचदा बाहेर हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये तेलकट, मसालेदार अन्न असते. यामुळे अपचन होण्याची शक्यता असते. अशावेळी बडीशेपमध्ये असलेले नैसर्गिक तेल (अॅनेथॉल) हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तर खडीसाखरेमुळे पित्ताचा त्रास कमी होतो. त्यामुळेच जेवणानंतर हे खाणे आरोग्यासाठी चांगले असते.
तोंडाची दुर्गंधी
लसूण आणि कांद्याचे प्रमाण जास्त असलेले अन्न खाल्ल्याने तोंडाला दुर्गंधी सुटू शकते. अशा वेळी बडीशेपमुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते. तर खडीसाखरेमुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. म्हणूनच बडीशेप खडीसाखरेला माउथ फ्रेशनरही म्हटले जाते.
गोडावर नियंत्रण
जास्त गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र बहुतेकदा जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे बडीशेप आणि खडीसाखरेचे सेवन केल्याने गोड पदार्थ खाण्याची इच्छा होणार नाही.
वारसा
याशिवाय भारतीय संस्कृतीत, जेवणानंतर बडीशेप- खडीसाखर देणे हा पाहुणचाराचा एक भाग आहे. यामुळे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये देखील हे दिले जाते.
Comments are closed.