Gota Patti Footwear: आऊटफिटला द्या ट्रेंडी टच; गोटा पट्टी डिझायनर फुटवेअर करा ट्राय
गणेशोत्सव, गौरी असे सणवार आता अवघ्या काही दिवसांवर आहेत. त्यामुळे महिला आता तयारीला लागल्या आहेत. आऊटफिटनुसार ज्वेलरी, फुटवेअर निवडणे कधीकधी कठीण होते. अशा वेळी तुम्ही यंदा सणाला एक ट्रेंडिंग फुटवेअर नक्कीच ट्राय करू शकता. ते म्हणजे गोटा पट्टी डिझायनर फुटवेअर. हा प्रकार साडी, सलवार सूट अशा पारंपरिक पोशाखावर शोभून दिसतो.
या प्रकारच्या फुटवेअरवर भरपूर वेगवगेळी डिझाईन असते. तसेच वेगवेगळ्या रांगांमध्ये हे उपलब्ध असते. तुम्ही तुमच्या आऊटफिटनुसार याचा रंग निवडू शकता. शिवाय डिझाइनर साडी किंवा ड्रेसवर हे फुटवेअर शोभून दिसते. चप्पल, जुत्ती असे अनेक फॅन्सी प्रकार यामध्ये आहेत. बाजारात याची किंमत 400 ते 700 रुपयांपर्यंत आहे.
कोल्हापुरी प्रकार
तुम्हाला एकदम पारंपरिक फुटवेअरचा पर्याय हवा असल्यास तुम्ही कोल्हापुरी गोटा पट्टी डिझायनर चप्पल घेऊ शकता. यामुळे तुमच्या लूकमध्ये भर पडेल. साडी किंवा ड्रेसवर ही चप्पल शोभून दिसते.
जट्टी
पंजाबी ड्रेस, सलवार सूट, धोती पॅटर्न जर तुम्ही सणाला घालणार असाल तर त्यासाठी गोटा पट्टी डिझायनर जुत्ती नक्की ट्राय करा. तुम्ही तुमच्या आऊटफिटच्या रंगानुसार ते स्टाईल करू शकता.
दगड काम चप्पल
गोटा पट्टीमध्ये स्टोन वर्क डिझायनर चप्पलचा प्रकार आहे. हा फॅन्सी प्रकार डिझायनर ड्रेस किंवा साडीवर सूट होतो.
गोटा पट्टी या प्रकारामध्ये भरपूर व्हरायटीज असतात. म्हणजे गोटा पट्टी साडी, ड्रेस, दुपट्टा हे तर पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. यामध्ये खूप भरतकाम केले जाते. खरे तर, पूर्वीच्या काळी राजघराण्यांकडून हा प्रकार वापरला जात होता. पण आजकाल तो सामान्य झाला आहे.
Comments are closed.