Ganeshotsav Decoration: गणेशोत्सवासाठी वास्तू नियमांनुसार करा घराची सजावट
सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश पुराणानुसार, या तिथीला गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. त्यामुळे घरोघरी आता बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. मात्र गणेशोत्सवासाठी घर सजवताना वास्तूच्या काही खास नियमांचे पालन केल्यास शुभ परिणाम मिळतात. म्हणूनच गणेशोत्सवासाठी वास्तुशास्त्रानुसार घराची सजावट कशी करावी हे आपण जाणून घेऊया…
मुख्य दार
घराची सजावट करताना मुख्य प्रवेशद्वार आकर्षणाचे केंद्र असते. मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावू शकता. तसेच दारावर कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढणे चांगले असते. याशिवाय रांगोळी काढणे देखील खूप शुभ मानले जाते. तुम्ही मुख्य दरवावर ताज्या झेंडूच्या फुलांची सजावट देखील करू शकता.
पवित्रा
वास्तुशास्त्रानुसार, गणपतीची मूर्ती स्थापित करण्यासाठी लाकडी आसन वापरावे. तसेच उत्तर किंवा ईशान्य दिशेला ते ठेवावे आणि त्यावर पिवळे किंवा लाल रंगाचे कापड टाकावे. बॅकड्रॉपला तुम्ही फुलांच्या माळा किंवा केळीची पाने, फुले, तोरण इत्यादी लावू शकता.
रंग
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या सजावटीसाठी योग्य रंगांचा वापर करणे खूप महत्वाचे आहे.त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. घराच्या सजावटीसाठी पिवळा, लाल, हिरवा शुभ रंग मानले जाते. तर काळा आणि गडद निळा असे गडद रंग वापरणे टाळावे. हे रंग शुभ कामांसाठी चांगले मानले जात नाहीत.
दिशा
वास्तुनुसार, गणपती बाप्पाची मूर्ती ईशान्य दिशेला स्थापित करणे सर्वोत्तम मानले जाते. जर हे शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला देखील गणपतीची मूर्ती स्थापन करू शकता. याशिवाय गणेशजीची मूर्ती घेताना पांढऱ्या किंवा शेंदुरी रंगाची मूर्ती शुभ असते. तर गणपतीची सोंड डाव्या बाजूला वाकलेली असावी.
Comments are closed.