खणाच्या दागिन्यांनी पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच

लाडक्या गौरी-गणपतीचे आगमन आता काही दिवसातच होणार आहे. सणवाराचे दिवस असले की, महिलामंडळी सजूनधजून तयार होऊन पूजा -अर्चना करतात. सजूनधजून तयार व्हायचे म्हटल्यावर साडी, दागिने आलेच. सध्या जुनीच फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये येत असल्याचे आपण पाहतो. हल्ली पारंपरिक लूकला विविध पद्धतीने मॉडर्न टच दिला जात असल्याचे आहे. त्यापैंकी एक आहे खणाचे दागिने. अनेक सेलिब्रिटीसुद्धा खणाचे दागिने विविध ड्रेसवर स्टाइल करताना दिसत आहेत.

खणाचे दागिने म्हणजे काय?

खणाचे दागिने म्हणजे कापडी धागे वापरून तयार केलेले फॅब्रिक दागिने. ज्यामध्ये कानातले, नेकलेस, बांगड्या यांचा समावेश होतो. हे दागिने पारंपरिक खणाचे कापड वापरून बनवले जाते. हे दागिने वजनाने हलके आणि परिधान करायला कंफर्टेबल असतात.

खणाच्या दागिन्यांचे प्रकार –

पेंडेट मंगळसूत्र –

प्रतिमा स्रोत: Google

वरील फोटोत दिसत असलेले मंगळसूत्र तुम्ही साडीवर ट्राय करु शकता. त्यावरील नथ हवी असल्यास किंवा नको असेल तर काढून साडीवर घालता येईल. तुम्हाला यात बाजारात हव्या त्या रंगसंगतीत हे मंगळसूत्र मिळतील. या मंगळसुत्रामुळे तुम्हाला पारंपरिक लूकसोबत मॉडर्न टच देखील मिळेल.

चोकर –

प्रतिमा स्रोत: Google

गळ्याभोवती घट्ट बसणारा चोकर पारंपरिक लूकवर खूप छान दिसतो. तुम्ही साडीवर हे खणाचे चोकर घालू शकता. या चोकरसोबत तुम्हाला कानातले सुद्धा मॅचिंग घालता येतील. काठापदराच्या साडीसोबत खणाचे चोकर तुमचा लूक अधिक खूलवेल.

बांगड्या –

प्रतिमा स्रोत: Google

आपण दोन्ही हातात अशा प्रकारच्या खणाच्या कापडापासून तयार केलेल्या बांगड्या घालू शकता. ज्या साडीवर खूप छान दिसतात.

हार –

प्रतिमा स्रोत: Google

जर तुम्हाला साडीवर हेवी आणि भरीव लूक हवा असेल तर तुम्ही असे नेकलेस ट्राय करू शकता. यात बाजारात नवनवीन प्रकार आणि रंग आले आहेत. तुम्ही हव्या त्या रंगाचे खरेदी करून घालू शकता.

 

 

हेही पाहा –

Comments are closed.