75 टक्के आयुष्य कुंडलीत ठरलेलं असतं तर, 25 टक्के आपल्या हातात…वाचा तज्ञ काय सांगतात
गेल्या काही वर्षांत वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र याकडे लोकांचा वाढता कल दिसून येतोय. आयुष्यातील सुख-दुःख, यश-अपयश, संधी आणि संकट यामागचं कारण जाणून घेण्यासाठी लोक तज्ञांकडे धाव घेतात. यावर ओन्ली मानिनीला दिलेल्या मुलाखतीत वास्तु व ज्योतिष तज्ञ शुभांगी राणे यांचं म्हणणं लक्षवेधी ठरलं. (life astrology 75 percent fixed shubhangi rane)
त्यांच्या मते, “माणसाचं आयुष्य हे दोन भागांत विभागलेलं असतं. जवळपास 75 टक्के आयुष्य हे कुंडलीत आधीच लिहून ठेवलेलं असतं. मात्र उरलेलं 25 टक्के आयुष्य हे आपल्या हातात असतं. यालाच आपण कर्म म्हणतो. आपण कसं वागतो, कोणते निर्णय घेतो, साधना किंवा उपाय करतो की नाही यावर त्या 25 टक्क्यांचा परिणाम ठरतो.”
राणे सांगतात की साधना, सकारात्मक दृष्टीकोन आणि शास्त्रानुसार दिलेले उपाय करून एखाद्या व्यक्तीचं कर्मशक्ती वाढवता येतं. “उदाहरणार्थ, जर एखाद्याने आपलं कर्म 25 वरून 30 टक्क्यांपर्यंत वाढवलं तर त्याचं 75 टक्क्यांचं आधीच ठरलेलं आयुष्य बदलतं आणि परिणाम अधिक चांगले मिळतात. त्यामुळेच महात्मे आणि संत 100 टक्क्यांपर्यंत पोहोचतात,” असं त्यांचं मत आहे.
त्यांच्या मते, वास्तु, ज्योतिष, आयुर्वेद, अंकशास्त्र यांसारखी शास्त्रं ही केवळ अंधश्रद्धा नसून, ती अनुभवावर आधारित शास्त्रं आहेत. योग्य पद्धतीने वापरल्यास ती माणसाचं जीवन घडवण्यात मदत करतात.
Comments are closed.