बाप्पाचे आवडते फूल आहे आरोग्यदायी, वाचा काय आहेत फायदे
श्री गणेशाला प्रिय असलेले, मोहक दिसणारे जास्वंदीचे फूल अनेक रंगामध्ये पाहायला मिळते. लाल, पांढरा, पिवळा, गुलाबी अशा विविध रंगामध्ये हे फूल मिळतते. जास्वंदाच्या फुलाला हिबिस्कस रोजास सिनेन्सीस असे शास्त्रीय नाव आहे. गणपती बाप्पाचे आवडते फूल अशी या फुलाची ओळख आहे. पण, हे फूल केवळ दिसायलाच नाही तर आरोग्यासाठी विशेष गुणकारी मानले जाते. जास्वंदीच्या फुलात विविध पोषकतत्वे आढळतात. यात व्हिटॅमिन के, कॅल्शियम, फायबर, लोह अशी अनेक तत्वे आढळतात. त्यामुळे अनेक आजारांच्या उपचारासाठी या फुलाचा वापर करण्यात येतो. आजच्या लेखात जाणून घेऊयात, जास्वंदाचे फुलाचे आरोग्यदायी फायदे
फायदे –
- जास्वंदीच्या फुलांचा काढा शरीरातील कोलेस्टेरॉलची मात्रा नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यातील पोषकतत्वे शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत करतात.
- जास्वंदीची पाने उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी वरदान समजली जातात. यासाठी तुम्हाला जास्वंदीची पाने पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहेत. तयार पाण्याचे सेवन केल्याने हृदयाची जलद गती संथ होण्यास मदत होते.
- जास्वदांच्या फुलांमधील नैसर्गिक ऍसिड त्वचेवरील काळे डाग, पिंपल्सचे डाग कमी होतात. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या असतील तर जास्वदांच्या फुलांचा वापर करता येईल.
- तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर जास्वंदीची पाने पाण्यात घालून उकळवून त्याचे सेवन करावे. यामुळे थकवा जाणवणार नाही.
- दररोज काही दिवस एक चमचा जास्वंदीचा रस दुधासोबत घेतल्यास शरीरातील लोहाची कमतरता दूर होऊ शकते.
- जास्वंदीच्या पानांचा काढा काही दिवस घेतल्यास किडनी स्टोन विरघळण्यास मदत होते. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असेल तर हा उपाय करून पाहावा.
- जास्वंदात मुबलक प्रमाणात लोह असल्याने अॅनिमिया असलेल्या रुग्णांसाठी जास्वंद उपयुक्त ठरते.
- केसांसाठी जास्वंद गुणकारी आहे. या तेलाच्या वापराने केसांची वाढ सुधारण्यासाठी मदत होते.
- जास्वंद एक नैसर्गिक चरबी-बर्नर आहे. यात ऍटी-ऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास सुरुवात होते.
हेही पाहा –
Comments are closed.