सणवारात असा चमकवा चेहरा, जाणून घ्या हे सोपे हॅक्स
सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहीना काही करत असतात. काहींना तर प्रत्येक महिन्यात पार्लरला जाऊन विविध ट्रिटमेंट घेण्याची सवय असते. जसे की, फेशियल, वॅक्सिंग, आयब्रो, क्लीनअप आदी. पण, याने चेहऱ्यावर ग्लो येत असला तरी खिशाला चांगलीच कात्री पडते. सध्या सणवाराचे दिवस सुरू आहेत, तुम्हालाही चेहऱ्यावर इंन्सन्ट ग्लो हवा असेल आणि अधिकचे पैसे खर्च करायचे नसतील तर जाणून घेऊयात चेहरा चमकवण्याचे सोपे हॅक्स
कोरफड ठरेल उपयुक्त –
त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड उपयुक्त मानली जाते. या दिवसात तुम्ही कोरफडीचा फेसपॅक वापरू शकता किंवा कोरफडीतील गर काढून त्याचा वापर चेहऱ्यासाठी करू शकता. कोरफडीच्या गराने चेहरा स्वच्छ करता येईल, यामुळे त्वचा ताजी दिसेल.
चेहरा पाण्याने धुवा –
दिवसभर आपण बाहेर असल्याने चेहऱ्यावर घामामुळे घाण साचते. त्यामुळे दिवसातून किमान दोनदा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. असे केल्याने मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते.
मुलतानी मातीचा करा वापर –
सणवारात झटपट चेहऱ्यावर चमक असेल तर मुलतानी मातीचा वापर करता येईल. यासाठी मुलतानी माती गुलाबपाण्यात मिक्स करून तयार पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करावा.
चेहरा स्क्रब –
बाजारातील महागड्या स्क्रब विकत घेण्यापेक्षा तुम्ही घरीच स्क्रबर तयार करू शकता. यासाठी नारळाच्या तेलात साखर मिक्स करून मिश्रण तयार करून घ्यावे. तयार मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावावे. यामुळे त्वचेवरिल जमा झालेली घाण निघेल आणि चेहरा चमकू लागेल.
हेही पाहा –
Comments are closed.