Beauty Tips: स्किनटोननुसार लावा काजळ; डोळे दिसतील आकर्षक
काजळ… हे जवळपास सर्वच महिला लावतात. काजळ लावल्याने डोळे सुंदर दिसतात. पूर्वी काजळ हे केवळ काळ्या शेडमध्ये असायचे. पण आज काळ यामध्ये अनेक शेड्स उपलब्ध आहेत. मग अशा वेळी आपल्या डोळ्यांसाठी कोणत्या रंगाचे काजळ चांगले दिसते हा प्रश्न पडू शकतो. तुम्ही तुमच्या स्किनटोननुसार काजळ लावल्यास चेहरा अधिक सुंदर दिसतो.
फेअर स्किनटोन म्हणजेच गोरा रंग
जर तुमची त्वचा गोरी असेल तर तुम्ही काळे काजळ लावू शकता. नैसर्गिक लूकसाठी, तुम्ही सॉफ्ट ब्लॅक काजळ देखील लावू शकता. आता ब्लॅकमधील आणखी एक शेड जेट ब्लॅक काजळ हे खास प्रसंगी सूट होते. काळ्या रंगाव्यतिरिक्त, डार्क ब्राऊन आणि चारकोल ग्रे शेडचे काजळ तुमच्या स्किनटोनला चांगले दिसेल.
मिडियम स्किनटोन म्हणजे सावळा रंग
मिडियम स्किनटोन असल्यास काळे काजळ सूट तर होतेच त्याशिवाय ब्रॉन्झ, ऑलिव्ह ग्रीन, नेव्ही ब्लू किंवा कॉपर शिमर काजळ देखील वापरू शकता. जर तुम्हाला मॉडर्न लूक हवा असल्यास ऑलिव्ह ग्रीन आणि नेव्ही ब्लू काजळ लावू शकता. तसेच पेस्टल शेड्सचे काजळ टाळावे यामुळे डोळे निस्तेज दिसू शकतात.
डीप स्किनटोन म्हणजेच काळा रंग
डीप स्किन टोनवर डीप प्लम, कोबाल्ट ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन काजळ लावू शकता. जर तुम्हाला डबल टोन इफेक्ट हवा असेल तर काळ्या काजळासह हिरव्या किंवा निळ्या शेडचे कॉम्बिनेशन करू शकता. या स्किनटोनवर फिकट शेड शोभून दिसत नाहीत.
Comments are closed.