Ganpati Decoration Ideas: गणपती डेकोरेशन DIY टिप्स आणि आयडिया

लाडक्या बाप्पाचे आगमन आता होणार आहे. यासाठी सर्वच घरात बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरू झाली आहे. सजावटीचे साहित्य, बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी बाजारपेठाही गजबजल्या आहेत. मात्र यंदा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बाप्पासाठी सजावट करू शकता. त्यासाठी काही सोप्या टिप्स आपण पाहूया..

पारंपारिक फ्लोरल डेकोरेशन
तुम्ही जर पारंपारिक सजावटीचा पर्याय शोधात असाल तर फ्लोरल डेकोरेशन हा उत्तम पर्याय आहे. गुलाब, झेंडूसारख्या ताज्या फुलांचा तुम्ही वापर करू शकता. तसेच ताजी फुले शक्य नसल्यास तुम्ही आर्ट पेपर वापरून डेकोरेशनच्या माळा तयार करू शकता.

वॉटर एलईडी दिवे
वॉटर एलईडी दिवे बाप्पासाठी आधुनिक सजावटीचा पर्याय असू शकतो. तुम्ही बाप्पाजवळ हे वॉटर एलईडी दिव्यांचे डेकोरेशन करू शकता. यामुळे

पारंपारिक फॅब्रिक ड्रेप्स
आता फुले, एलईडी दिवे यापेक्षा फॅब्रिक ड्रेप्स हा अगदी सोपा पर्याय आहे. यासाठी घरी असणाऱ्या साड्या, ओढण्या वापरून तुम्ही बॅकड्रॉप डेकोरेशन करू शकता. यासाठी सोनेरी, लाल किंवा पिवळ्या रंगाचा वापर केल्यास फेस्टिव्ह लूक येईल.

केळीच्या पानांचे डेकोरेशन
जर तुमच्या घरी एक- दीड दिवसांचा गणपती असेल तर तुम्ही ताजे केळीचे पान आणि पिवळ्या फुलांची सजावट करू शकता. हे कॉम्बिनेशन सहसा सणवार, उत्सवांसाठी हमखास वापरले जाते आणि ते शोभूनही दिसते.

कागदी डेकोरेशन
तुम्ही क्राफ्ट पेपरपासून विविध आकार तयार करून बॅकड्रॉपला डेकोरेशन करू शकता. क्राफ्ट पेपरमध्ये भरपूर रंग उपलब्ध असतात. विविध रंग वापरल्यास डेकोरेशन शोभून दिसेल.

पेपरग्लास सजावट
पेपरग्लासना विविध रंग देऊन बाप्पासाठी सजावट करू शकता.

पर्यावरणपूरक गणपती मूर्ती
आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निवडा. नैसर्गिक माती आणि रंगांपासून बनवलेल्या मूर्ती सहजपणे विसर्जित केल्या जाऊ शकतात. त्या पर्यावरणपूरक उत्सवासाठी योग्य पर्याय ठरतात.

Comments are closed.