जुना प्रेशर कुकर ठरतो घातक, कारण जाणून घ्या अन्यथा…

आपल्या घरात अनेक जण वर्षानुवर्षे एकाच प्रेशर कुकरचा वापर करतात. “मजबूत आहे, अजून चालेल” असं म्हणून लोक जुना कुकर वापरणं सुरू ठेवतात. पण हा नेमका निर्णय आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. अलीकडेच मुंबईत एका व्यक्तीला शिशाची विषबाधा (Lead Poisoning) झाली आणि तपासात समोर आलं की त्याने शिजवलेलं अन्न 20 वर्षे जुना प्रेशर कुकर वापरून बनवलं होतं.

जुना कुकर धोकादायक का ठरतो?

प्रेशर कुकर मजबूत असल्यामुळे लोक तो दशकानुदशके वापरतात. परंतु जुन्या अॅल्युमिनियम प्रेशर कुकरच्या निर्मितीत निकृष्ट दर्जाचं रीसायकल केलेलं अॅल्युमिनियम वापरलं असेल, तर त्यात शिसे मिसळलेलं असण्याची शक्यता असते.

•कुकरच्या सॉल्डरिंग किंवा कोटिंगमध्ये शिसे आढळू शकतं.

•धातू प्रक्रियेदरम्यान बाहेरून होणारं दूषितीकरणही अन्नात शिसे मिसळण्यास कारणीभूत ठरतं.

असं झालं तर दररोज त्या कुकरमध्ये शिजवलेलं अन्न शरीरात हळूहळू विषारी धातू पोहोचवत राहतं.

शिशाचा आरोग्यावर परिणाम

शिसे शरीरातून लगेच बाहेर पडत नाही. ते हळूहळू ऊतींमध्ये साठतं आणि दीर्घकाळानंतर त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसू लागतात.

•मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम

•मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड

•हाडांच्या आरोग्यावर परिणाम

•स्मृती कमी होणे व दीर्घकालीन आजार

विशेष म्हणजे मुलांमध्ये शिकण्याचा वेग कमी होणे, वर्तनात बदल होणे असे परिणाम होतात. प्रौढांमध्ये विस्मरण, थकवा, वंध्यत्व आणि पचनाचे आजार उद्भवू शकतात. गर्भवती महिलांमध्ये मात्र धोका अधिक गंभीर असतो. शिसे गर्भापर्यंत पोहोचतं आणि अजून न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

लक्षणे कोणती असू शकतात?

शिशाची विषबाधा लगेच जाणवत नाही. पण काही काळानंतर खालील तक्रारी दिसू शकतात –

•पोटात तीव्र वेदना

•वारंवार मळमळ होणे

•थकवा व अशक्तपणा

•शिकण्यात अडचणी, वर्तनातील बदल

• यूरिनोपेरिक समस्या संबंधित समस्या

काय कराल?

जर घरात अजूनही खूप जुना प्रेशर कुकर असेल, तर तो बदलणे हा सर्वात सुरक्षित उपाय आहे. स्वयंपाकघरात वापरली जाणारी भांडी केवळ मजबूतच नव्हे तर सुरक्षितही असणं तितकंच महत्त्वाचं आहे. दीर्घायुषी वाटणारा जुना कुकर नकळत तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यास धोका पोहोचवत असेल.

Comments are closed.