Rishi Panchami :ऋषीपंचमीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

भाद्रपद महिना हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते. आज घराघरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. लाडका बाप्पा मोठमोठ्या मंडळातही विराजमान झालेला आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी असते पंचमी. ही पंचमी ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते. ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी होय. याशिवाय असे सांगितले जाते की,ऋषीपंचमी हे व्रत सप्तर्षींच्या पूजेसाठी समर्पित आहे, जे प्रामुख्याने महिला करतात. आज आपण जाणून घेऊयात, ऋषीपंचमीचे महत्त्व, मुहूर्त आणि पुजाविधी,

ऋषी पंचमीचे महत्त्व

ऋषीपंचमीचे व्रत प्रामुख्याने महिला करतात. असे मानले जाते की या व्रतामुळे महिलांना मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या विकारापासून मुक्तता मिळते. या दिवशी गंगा नदीत स्नान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय मासिक पाळीचा धर्म पाळण्यात जर काही चूक झाली असेल, तर त्याचे पाप क्षालन करण्यासाठी हे व्रत करतात.

मुहुर्ता –

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3:44 वाजता सुरू होणार आहे. तर ही तिथी 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:56 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, 28 ऑगस्ट, गुरुवार रोजी ऋषीपंचमी साजरी केली जाईल.

प्रगा भागि –

  • ऋषीपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • त्यानंतर घर आणि देवघर स्वच्छ करावे.
  • पूजास्थळी पाट ठेवावा. त्यावर लाल किंवा पिवळे कापड अंथरावे.
  • त्यावर सप्तर्षी ऋषींचे चित्र ठेवावे. तुम्ही कलश सुद्धा ठेवू शकता.
  • यानंतर ऋषींना पाणी अर्पण करावे.
  • अगरबत्ती दाखवावी.
  • पूजेत फळे, फूले, तूप, पंचामृत अर्पण करावे.
  • यानंतर प्रार्थना करावी आणि प्रसाद वाटावा.

(टीप – ऋषीपंचमीची पूजा ही विविध पद्धतीने केली जाते. वरील माहिती ही साधारण माहितीवर आधारीत आहे)

हेही वाचा – दीड दिवसाचा बाप्पा आणि त्यामागील रंजक गोष्ट

Comments are closed.