कमी जागेत लावता येतील ही फुलझाडे
झाडांमुळे घरात हवा खेळती राहते, ऑक्सीजनचा पुरवठा होतो शिवाय घराची शोभा देखील वाढते. पण, घरासभोवताली जागा कमी असल्याने आवड असूनही झाडांची लागवड अनेकदा करता येत नाही. अशावेळी खिडकी, बाल्कनीत विविध झाडे लावण्यात येतात. मुंबईसारख्या शहरात झाडे लावण्यासाठी घरामध्ये किंवा घराभोवती झाडे लावणे जरा मुश्किलच दिसते. अशावेळी तुम्ही घरामध्येच कमी जागेत फुलणारी झाडे लावायला हवीत. आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात, कमी जागेत लावता येतील अशी फुलझाडे,
जास्वंद –
गणपती बाप्पाचे आवडते फूल तुम्ही घरात लावू शकता. जास्वदांच्या झाडाला वाढण्यासाठी जास्त जागा लागत नाही.
अनंत –
अनंताचे अंगणात लावले जाते. पण, तुम्ही हे झाड बाल्कनीतही लावू शकता.
सदाफुली –
सदाफुलीची रोपे कमी जागेत लावता येतील. याशिवाय सदाफुली रंगीत आणि टवटवीत आहेत. त्यामुळे बाल्कनीत लावण्यासाठी सदाफुली उत्तम ऑप्शन आहे.
चमेली –
चमेली तुम्ही खिडकीत लावू शकता. या झाडाला अधिक जागा लागत नाही शिवाय जास्त पाण्याची आवश्यकता नसते. फक्त अधिक सूर्यप्रकाशाची गरज असते.
तागार –
तगर हे एक कमी जागेत वाढणारे सुंदर आणि आकर्षक फुलझाड आहे.
जय-जुई-
जाई-जुईच्या वेलींना जास्त जागा लागत नाही. त्यामुळे त्या कुंडीतही लावता येतात.
हेही पाहा –
Comments are closed.