Skincare Tips: ड्राय लिप्सवर प्रभावी ठरतील हे घरगुती उपाय
ड्राय लिप्सची समस्या ही जवळपास सामान्य आहे. यावर उपाय म्हणून अनेकदा महिला बाजारातील महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र तरीही हवा तसा फरक जाणवत नाही. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय केल्याने ओठांचा कोरडेपणा दूर होऊ शकते. ते उपाय कोणते ते जाणून घेऊया…
कोरफडीचे जेल
जर तुम्हाला ओठांचा कोरडेपणा जाणवत असेल तर कोरफडीचे जेलयावर प्रभावी उपाय ठरू शकते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर कोरफडीचे जेल लावावे. यामुळे तुमचे ओठ हायड्रेटेड आणि मऊ राहतील.
चहाच्या झाडाचे तेल
आता कोरड्या ओठांच्या समस्येवर कोरफडीच्या जेल व्यतिरिक्त टी ट्री ऑइल देखील फायदेशीर ठरते. यामुळे ओठ मऊ आणि कोमल होतील. टी ट्री ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे काही थेंब मिसळून रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावावे. हे घरगुती उपाय ड्राय लिप्सचा त्रास कमी करण्यासाठी नक्कीच मदत करतील.
हे लक्षात ठेवा:
त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी लोक अनेक उत्पादने वापरतात मात्र यासाठी योग्य आहार आणि पोषण देखील महत्त्वाचे आहे. त्वचेच्या समस्या कमी होण्यासाठी तुम्ही निरोगी आहार घेणे गरजेचे आहे.
Comments are closed.