Black Henna Disadvantages: काळ्या मेहंदीने केस कलर करता? मग सावधान केसांचे होईल नुकसान
आजकाल चुकीची जीवनशैलीमुळे कमी वयात अनेकांचे केस पांढरे होतात. मग लोक केसांना कलर, काळी मेहंदी लावतात. याद्वारे केस लगेच काळे दिसतात पण याचे वाईट परिणाम कालांतराने जाणवतात. बाजारात उपलब्ध असणारी काळी मेहंदी नैसर्गिक किंवा हर्बल म्हणून विकली जाते. पण त्यामुळे केसांना नुकसान होते.
काळी मेहंदी खरोखर नैसर्गिक आहे का?
आता सर्वप्रथम जाणून घेऊया की ही काळी मेहंदी खरोखर नैसर्गिक आहे का? तर नाही. ही मेहंदी नैसर्गिक नसते. अनेक कंपन्या हर्बल किंवा नैसर्गिक असे मार्केटिंग करतात. पण काळ्या मेहंदीमध्ये रसायने मिसळलेली असतात. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक काळ्या मेहंदीमध्ये पीपीडी नावाचे रसायन आढळते.
हा एक कृत्रिम रंग आहे जो केसांना त्वरित गडद काळा रंग देतो. पण उलट जर नैसर्गिक मेहंदी असेल तर त्यामुळे केसांना हलका तपकिरी किंवा लाल रंग येतो. पण काळी मेहंदी लावल्याने केस काळे दिसतात. याचाच अर्थ त्यामध्ये रसायने मिसळलेली असतात.
आता काळी मेहंदी लावण्याचे फायदे जाणून घेऊया:
- काळी मेहंदी लावल्याने पांढरे केस लवकर काळे होतात.
- हे लावायला सोपे असते.
- काही ब्रँडमध्ये हर्बल घटक असतात आणि त्यात रसायनांचे प्रमाण कमी असते.
- हे लावल्याने काही काळासाठी केस चमकदार बनतात.
आता काळी मेहंदी लावण्याचे नुकसान जाणून घेऊया..
- यामुळे अॅलर्जी किंवा जळजळ होण्याची शक्यता असू शकते.
- या मेहंदीमुळे टाळूला खाज येऊ शकते किंवा जळजळ होते.
- केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात.
- केसगळती वाढते.
- दीर्घकाळ वापरल्याने केस कोरडे होऊ शकतात.
Comments are closed.