Beauty Hacks: 3 स्मार्ट ब्युटी हॅक अन् ग्लॉसी लिपस्टिकला झटपट द्या मॅट लूक
अनेकदा असे होते की आपल्याकडे एकाच प्रकारचे लिपस्टिक असतात. अशाचप्रकारे जर तुमच्याकडे खूप ग्लॉसी लिपस्टिक असतील आणि तुम्हाला मॅट लिपस्टिक लूक हवा असेल तर अनेकदा बाजारातून महागडे मॅट लिपस्टिक खरेदी केले जातात. अशा परिस्थितीत तुम्ही काही स्मार्ट टिप्स वापरून घरच्या घरी बजेट-फ्रेंडली ब्युटी हॅक वापरून ग्लॉसी लिपस्टिकला मॅट लूक देऊ शकता. ते कसे ते जाणून घेऊया…
स्टेप 1: तुमची आवडते ग्लॉसी लिपस्टिक लावा
सर्वात आधी तुम्हाला हव्या त्या शेडचे ग्लॉसी ग्लॉसी लिपस्टिक अलगद ओठांवर लावा. आता लिपलाइनर लावून लिपस्टिक लावल्यास ती परफेक्ट लागते. तसेच ती जास्त काळ टिकते. यामुळे ओठांवर एक चांगला बेस तयार होईल.
स्टेप 2: टिश्यू पेपरने पुसा
आता एक स्वच्छ टिश्यू पेपर घ्या आणि तो ओठांवर हलक्या हाताने दाबा. हे करताना एक लक्षात ठेवा की टिश्यू पेपर ओठांवर घासू नको. फक्त हलक्या हाताने अतिरिक्त लिपस्टिक काढा. म्हणजे त्याचा ग्लॉसी शेड कमी होईल.
स्टेप 3: पावडर लावून फिनिशिंग
आता शेवटी, तुमच्याकडे असलेली कॉम्पॅक्ट पावडर घ्या. लहान ब्रशने किंवा बोटाने हलक्या हाताने ओठांवर लावा. अशा प्रकारे तुमची ग्लॉसी लिपस्टिकला आता एक सुंदर मॅट लूक मिळाला आहे.
- या हॅकसाठी कोणत्याही महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सची आवश्यकता नाही, फक्त ग्लॉसी लिपस्टिक, टिश्यू पेपर आणि कॉम्पॅक्ट पावडर पुरेसे आहेत.
- जर तुम्हाला परफेक्ट लूक हवा असेल तर तुम्ही शेवटी थोडे लिप लाइनर पुन्हा लावू शकता.
ट्रेंडिंग ब्युटी हॅक
आजकाल बरेच मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी ब्लॉगर्स इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर देखील ही स्मार्ट ब्युटी ट्रिक शेअर करत आहेत. आता प्रत्येक वेळी मॅट लिपस्टिक खरेदी करण्याची गरज नाही. या सोप्या ब्युटी हॅकसह, तुम्ही मॅट लिपस्टिक लूक मिळवू शकता.
Comments are closed.