या सवयी मेंदूला कमकुवत बनवतात, आजच करा सवयीत बदल

शरीराच्या महत्त्वपूर्ण अवयवांपैकी एक आपला मेंदू आहे. त्यामुळे आपण जशी इतर अवयवांची काळजी घेतो त्याप्रमाणे मेंदूची काळजी घेणे गरजेचे असते. पण, अनेकदा आपल्या रोजच्या सवयीचं मेंदूचं आरोग्य खराब करण्यास कारणीभूत ठरतात. ज्यामुळे मेंदू कमकुवत होत जातो. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला कठीण जातात. तुमच्याही बाबतीत असंच काहीसं घडत असेल तर आज आपण जाणून घेऊयात अशा सवयी ज्या मेंदूला कमकुवत बनवतात.

या सवयी ठरतात कारणीभूत –

गोड खाणे –

गोड खायला कोणाला आवडत नाही. आता तर सणवाराचे दिवस असल्याने जास्त गोड, साखरयुक्त पदार्थ खाल्ले जातात. पण, हे गोड पदार्थ मेंदूसाठी हानिकारक असतात. जास्त गोड खाल्ल्याने मेंदूमध्ये सूज येते, ज्यामुळे शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याऐवजी फळे खावीत.

झोपेचा अभाव –

अपूर्ण झोपेचा मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यात धावपळीच्या रोजच्या रुटीनमुळे झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे तुमची झोप अपूर्ण होत नसेल तर ही सवय मेंदूसाठी घातक ठरू शकते.

एकटेपणा –

तुम्ही सतत एकटे राहत असाल कोणामध्ये मिक्स होत नसाल तर हे देखील मेंदूच्या आरोग्यासाठी योग्य नाही. जेव्हा मेंदू सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतो तेव्हा मेंदूचा व्यायाम होतो आणि अधिक तीक्ष्ण होतो. त्यामुळे अधिकाअधिक कुटूंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा.

व्यायामाचा अभाव –

शरीरसोबत मन निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही नियमित शारीरिक हालचाली करता तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा होतो. परिणामी, मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि मेंदू निरोगी राहतो. त्यामुळे दररोज किमान 15 ते 20 मिनिटे व्याया करण्याचा प्रयत्न करावा.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=SXC34WA_ZL8

Comments are closed.