या सवयींनी बिघडलेलं मासिक पाळीचं चक्र होईल सुरळीत

मासिक पाळी ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे, जी दर महिन्यात महिलांना येते. या दिवसात महिलांना अनेक शारीरिक वेदनांचा त्रास सहन करावा लागतो. जसे की, पोट दुखणे, क्रॅम्प्स येणे, पायांमध्ये वेदना होणे. स्त्रियांचे आरोग्य आणि नियमित मासिक पाळी यांचा घनिष्ट संबंध आहे. जर महिलेला नियमित मासिक पाळी येत असेल तर ती सुदृढ मानली जाते. पण, काही महिलांना अनियमित मासिक पाळीला सामोरे जावे लागते. अशा वेळी तुम्ही तुमच्या सवयींकडे लक्ष द्यायला हवे. कारण अशा काही सवयी असतात, ज्या मासिक पाळीचे चक्र बिघडवण्यास कारण ठरतात. आज आपण अशा सवयी जाणून घेऊयात ज्या मासिक पाळीचे चक्र सुरळीत होण्यासाठी अंगी बाळगायला हव्यात.

प्रमाणात झोप घ्यावी –

अपूर्ण झोपेमुळे आणि जास्त झोपेमुळे संपूर्ण शरीराचे गणित बिघडते. त्यामुळे हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी जास्त झोपेवर मर्यादा घाला. कमीत कमी तुमची 7 ते 8 तास झोप होईल याकडे लक्ष द्या.

सकस आहार घ्या –

व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियमने समृद्ध असलेले अन्नपदार्थ खावेत. जंक फूड, फास्ट फूड खाणे टाळावे. कारण अयोग्य आहाराचा फटका शरीराला सहन करावा लागतो. मासिक पाळीचे चक्र सुरळीत सुरू राहण्यासाठी शरीरात आवश्यक पोषकतत्वे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे सकस आहार घ्या.

गर्भनिरोधक गोळ्या टाळा –

अनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी लग्नाआी किंवा लग्नानंतर गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करतात. पण, यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे मासिक पाळीचे चक्र सुरळीत सुरू राहत नाही.

वजन नियंत्रणात ठेवा –

अचानक वजनात बदल दिसत असेल तर त्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो. जर तुमचं वाढत असेल तर त्याचा परिणाम मासिक पाळीवर होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे मासिक पाळीचं चक्र सुरळीत सुरू राहण्यासाठी वजनावर नियंत्रण असावे.

ताण  कमी करा –

तणावामुळे शरीराचे नुकसान होते, हे आपणाला माहीत आहे. पण, ताणामुळे मासिक पाळीवर परिणाम होऊन अनियमित होऊ शकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि ताणाापासून दूर राहा.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=XHMOZT4ZXDI

Comments are closed.