Gauri Pujan: गौरी आगमनाला द्या या खास शुभेच्छा

लाडक्या गौरीचे उद्या घरोघरी आगमन होणार आहे. असं सांगितलं जातं की, गणेशोत्सवात गौरी तिच्या माहेरी येते. माहेरी येणाऱ्या माहेरवाशीणीचे जसे लाड केले जातात, त्याचप्रमाणे गौराईचे लाड केले जातात. तिला सजवलं जातं, पूजा करून नैवैद्य दाखवण्यात येतो. हा सण तीन दिवस साजरा केला जातो. गौरी पूजनावेळी तेरड्याच्या, खड्यांच्या, मुखवट्यांच्या किंवा मूर्तीच्या स्वरूपात गौरी आणल्या जातात. या मंगलदिनी तुम्ही आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही प्रियजनांना शुभेच्छा पाठवू शकता.

पाठवा खालील शुभेच्छा  –

गौरी आवाहनाच्या दिनी
गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी
आनंद आणि भरभराट घेऊन येऊ दे
ही सदिच्छा
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा

गौरी मातेला नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा

आली माझ्या गं अंगणी गौराई,
लाभो तुम्हास सुख समृद्धी,
गौरी आवाहनाच्या सर्वांना शुभेच्छा!

आली आली गौराई
सोन पावलांच्या रुपाने
आली आली गौराई
धनधान्यांच्या रुपाने
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

आली गौराई माहेराला, भाजी-भाकर द्या गं तिला जेवायला
करा तिची मनोभावे सेवा
ती देईल तुम्हा सुख-समृद्धीचा ठेवा
ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=CW-8SKLDEE

Comments are closed.