‘श्रेकिंग’ म्हणजे काय? दिसण्यापेक्षा स्वभावावर फिदा होणारा नवा डेटिंग ट्रेंड Gen-Z मध्ये लोकप्रिय
सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड्स समोर येत असतात. त्यात रिलेशनशिप आणि डेटिंगशी संबंधित ट्रेंड्सही विशेष चर्चेत राहतात. याच मालिकेत अलीकडेच एक नवीन डेटिंग ट्रेंड चर्चेत आला आहे ‘श्रेकिंग’ (Shrekking). हा ट्रेंड फक्त नावामुळे वेगळा नाही, तर त्यामागची संकल्पनाही लोकांना भावतेय. (what is shrekking dating trend genz following)
श्रेकिंग म्हणजे काय?
श्रेकिंग म्हणजे अशा व्यक्तीला डेट करणं ज्याचं सौंदर्य तुमच्या मापदंडांनुसार आकर्षक वाटत नाही, पण त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि वागणूक तुम्हाला जास्त भावते. या टर्मची प्रेरणा प्रसिद्ध अॅनिमेटेड फिल्म ‘श्रेक’ मधून घेतली आहे. श्रेक या चित्रपटात मुख्य पात्र दिसायला ‘परफेक्ट’ नव्हतं, पण त्याचं मन, प्रामाणिकपणा आणि मजेशीर स्वभाव सगळ्यांना भावतो.
का व्हायरल होतोय हा ट्रेंड?
आजच्या काळात अनेक लोक बाह्य सौंदर्यावर (Looks) जास्त लक्ष केंद्रित करतात. पण हा ट्रेंड सांगतो की खरं नातं सौंदर्यावर नाही, तर स्वभाव आणि समजूतदारपणावर टिकतं.
1) लोक आता समजू लागले आहेत की सुंदर दिसणं हे कायम टिकत नाही, पण चांगला स्वभाव आणि प्रामाणिकपणा दीर्घकाळ नातं टिकवतो.
2) त्यामुळे सोशल मीडियावर श्रेकिंग हा ट्रेंड वेगाने पसरतोय आणि लाखो तरुण त्याला आपलंसं करत आहेत.
Gen-Z का फॉलो करत आहे श्रेकिंग?
आजची Gen-Z जनरेशन नात्यात फक्त फिजिकल अट्रॅक्शनपेक्षा जास्त इमोशनल कनेक्शन आणि मेंटल पीस शोधते.
1) त्यांना नात्यात हास्यविनोद, समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा वाटतो.
2) त्यामुळे ते ‘श्रेकिंग’ फॉलो करून अशा पार्टनरकडे वळत आहेत, जो दिसण्यात सरासरी असेल, पण वागण्यात उत्कृष्ट असेल.
3) या ट्रेंडमुळे तरुणांना जाणवतं की परिपूर्ण नातं हे केवळ लुक्सवर नाही, तर भावनिक नात्यावर टिकतं.
श्रेकिंग हा फक्त एक ट्रेंड नसून नात्यांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य आणि स्वभावाची जाणीव अधिक महत्त्वाची आहे, आजची Gen-Z ही गोष्ट प्रत्यक्षात स्वीकारतेय आणि त्यामुळे हा ट्रेंड अधिक चर्चेत आहे.
Comments are closed.