हिंदी साहित्यातील मीरा – महादेवी वर्मा
भारतात 14 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय हिंदी दिन’ साजरा केला जातो. हिंदीचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. आपल्या देशात हिंदी समृद्ध करण्याचे काम अनेक लेखक, कवियित्रींनी केले आहे, त्यांपैकी एक म्हणजे महादेवी वर्मा. ज्यांना एका विशिष्ट नावाने ओळखले जाते. त्या केवळ कवियित्रीच नाही तर समाजसेविका देखील होत्या,थोडक्यात आढावा घेऊया त्यांच्या आयुष्याबद्दल,
जन्म आणि कुटूंब –
कवयित्री महादेवी वर्मा यांचा जन्म 26 मार्च 1907 रोजी उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात झाला. वडील गोविंद प्रसाद वर्मा पुरोगामी विचारसरणीचे होते, तर आई हेमरानी देवी धार्मिक होत्या आणि संस्कृत, हिंदीच्या विद्वान होत्या. यामुळेच महादेवींच्या मनात लहानपणापासूनच शब्दांचे संस्कार झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदूरच्या मिशन स्कूलमधून झाले. तर त्यांनी संस्कृत, इंग्रजी, संगीत, चित्रकलेच्या शिक्षणाचे धडे घरातच घेतले.
हिंदी साहित्यातील मीरा –
महादेवी वर्मा हिंदी साहित्यातील एक प्रमुख कवियित्रींपैकी एक होत्या. त्यांना ‘हिंदी साहित्यातील मीरा’ असे म्हटले जाते. रश्मी, नीरजा, संध्या, यम, प्रथम, आत्मिका, अग्निरेखा यांचा समावेश त्यांच्या प्रमुख रचनांमध्ये आहे. कवितेतील वेगळेपणा आणि वेदना यासाठी त्या ओळखल्या जातात.
साहित्य अकादमी फेलोशिप मिळवणारी पहिली महिला –
1979 मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप महादेवी वर्मा यांना देण्यात आली होती. ही फेलोशिप मिळालेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
पुरस्कार
- 1934: सेक्सेरिया पुरस्कार
- 1942: द्विवेदी पदक
- 1943: मंगला प्रसाद पुरस्कार
- 1943: भारत पुरस्कार
- 1956: पद्मा भूषण
- १ 1979 ::: साहीता अकादमी फेलोशिप
- 1982: ज्ञानपिथ पुरस्कार
- 1988: पद्मा विभुषन
महिलांसाठी केले लिखाण –
महादेवी वर्मा यांनी त्यांच्या लिखाणातून कायमच महिलांच्या स्थितीबद्दल, त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल आणि त्यांच्या हक्कांबाबत आवाज उठवला. त्यांच्या सर्वात जास्त कविता आणि निबंध हे स्रीवादी दृष्टीकोणावर आधारित आहेत. लिखाणासोबत त्या समाजसेवेतही सक्रिय होत्या. त्यांनी महिला शिक्षण आणि त्यांच्या हक्कांसाठी अनेक कार्ये केली आहेत. त्यांनी “प्रयाग महिला विद्यापीठ” नावाची एक शाळा स्थापन केली, ज्यामध्ये अनेक मुलींना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली.
मृत्यू –
महादेवी वर्मा यांचे 11 सप्टेंबर 1987 रोजी प्रयाग येथे निधन झाले. महादेवी वर्मा एका निर्भय, स्वाभिमानी भारतीय महिलेचे जीवन जगल्या. महादेवी वर्मा आज आपल्यासोबत नसल्या तरी आजही त्यांच्या कविता आणि त्यांचे जीवनकार्य सर्वांना प्रेरणा देत आहे.
हेही वाचा – ‘श्रेकिंग’ म्हणजे काय? दिसण्यापेक्षा स्वभावावर फिदा होणारा नवा डेटिंग ट्रेंड Gen-Z मध्ये लोकप्रिय
Comments are closed.