स्वतः ट्रेन केलेल्या AI चैटबॉटनेच घेतली नोकरी, बँक कर्मचाऱ्याचा धक्कादायक अनुभव
आज जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence – AI) वापर झपाट्याने वाढत आहे. AI मुळे कंपन्यांचे काम जलद होत असले तरी त्याचा सर्वात मोठा फटका बसतो तो कर्मचाऱ्यांना. कारण अनेकांच्या नोकऱ्या थेट धोक्यात आल्या आहेत. असंच एक आश्चर्यचकित करणारं प्रकरण ऑस्ट्रेलियामधून समोर आलं आहे. (ai chatbot replaced bank employee job)
येथील कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया या देशातील सर्वात मोठ्या बँकेने त्यांच्या जुन्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केले. यात २५ वर्षे बँकेत सेवा केलेल्या कॅथरीन सुलिवन यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, ज्याला त्यांनी स्वतः ट्रेन केलं, त्या AI चैटबॉटनेच त्यांची नोकरी हिसकावून घेतली.
२५ वर्षांच्या सेवेनंतर धक्का
६३ वर्षीय कॅथरीन सुलिवन यांनी २००० साली बँकेत प्रवेश केला होता. नुकताच त्या कस्टमर मेसेजिंग टीममध्ये काम करत होत्या. २८ जुलै रोजी त्यांना अचानक सांगण्यात आलं की, आता त्यांच्या सेवांची गरज उरलेली नाही. भावूक होत त्या म्हणाल्या “मी २५ वर्षे निष्ठेने काम केलं, बँकेचा गणवेश अभिमानाने परिधान केला, पण बदल्यात मला हे मिळालं.”
ज्याला शिकवलं त्यानेच घेतली नोकरी
काही महिन्यांपूर्वीपर्यंत कॅथरीन बँकेच्या ‘बम्बलबी’ नावाच्या चैटबॉटला ट्रेन करत होत्या. ग्राहकांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देण्यासाठी त्यांनी स्क्रिप्ट लिहिल्या, बॉटचे प्रतिसाद तपासले आणि गरज पडल्यास स्वतः हस्तक्षेप केला. त्यांना वाटलं होतं की, चैटबॉट सुरु झाल्यावर त्यांना दुसऱ्या भूमिकेत बदली दिली जाईल. पण प्रत्यक्षात मात्र त्या चैटबॉटनेच त्यांची जागा घेतली. त्यांच्या शब्दात “अनजाणे मी त्या बॉटला ट्रेन करत होते, ज्याने शेवटी माझी नोकरी काढून घेतली.”
बँकेची चूक मान्य
ही छंटनी झाल्यानंतर फायनान्स सेक्टर युनियन (FSU) ने बँकेच्या निर्णयाला आव्हान दिलं. सुरुवातीला बँकेने दावा केला होता की चैटबॉटमुळे दर आठवड्याला २,००० कॉल कमी झाले. पण नंतर हे खोटं ठरलं. कर्मचारी कमी झाल्यानंतर कॉल कमी होण्याऐवजी वाढल्याचं समोर आलं.
यानंतर बँकेने मान्य केलं की त्यांचा प्रारंभीचा अंदाज चुकीचा होता. ज्या ४५ पदांना अनावश्यक मानलं गेलं होतं, ती प्रत्यक्षात महत्त्वाचीच होती. बँकेने भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी आंतरिक पुनरावलोकन करण्याचंही आश्वासन दिलं.
परत बोलावलं पण नकार
नंतर बँकेने प्रभावित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची ऑफर दिली. मात्र सर्वांनी ती स्वीकारली नाही. सुलिवन यांनीही परतण्यास नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं “२५ वर्षे सेवा दिल्यानंतर ज्या पद्धतीने वागणूक मिळाली, त्यानंतर अशी भूमिका माझ्यासाठी योग्य राहणार नाही.”
AI तंत्रज्ञानामुळे बँका आणि कंपन्या आधुनिक होत आहेत, पण त्याच वेळी मानवी नोकऱ्यांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. कॅथरीन सुलिवन यांची कहाणी हेच दाखवते की, भविष्यात तंत्रज्ञान आणि रोजगार यामध्ये संतुलन राखणं किती महत्त्वाचं आहे.
Comments are closed.