अंडरआर्म्स काळे झालेत? काळपटपणा दूर करण्यासाठी वापरा हे पदार्थ

अंडरआर्म्स काळे झाले असतील हवे तसे कपडे घालता येत नाही. अनेकजणी तर स्लीवलेस घालणं देखील सोडून देतात. हल्ली बऱ्याच महिलांना अंडरआर्म्समधील काळेपणा ही समस्या सतावत आहे. या समस्येपासून मुक्तता व्हावी यासाठी महागड्या क्रीम्स आणि ब्युटी ट्रिटमेंटचा वापर करण्यात येत आहे. पण, तुम्ही दरवेळी हे महागडे ब्युटी प्रॉडक्ट न वापरता काही घरगुती उपचार करू शकता. स्वयंपाक घरातील नेहमीच्या वापरतील काही पदार्थांनी हा काळेपणा हळूहळू घालवता येऊ शकतो, हे पदार्थ कोणते आहेत? ते पाहूयात

लिंबू आणि साखरेचा स्क्रब –

  • एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि थोडी साखर घ्यावी.
  • हे मिश्रण अंडरआर्म्समध्ये काळ्या भागावर लावावे आणि हाताने स्क्रब करावे.
  • 10 ते 15 मिनिटांनंतर हा भाग स्वच्छ पाण्याने धुवावा.
  • हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.

हेही वाचा – रोज केस गळतात? इतके केस गळणं आहे अगदी नॉर्मल

हळद आणि टोमॅटोचा रस –

  • एका बाऊलमध्ये 1 चमचा बेसन, हळद, टोमॅटोचा रस आणि दूध असे चारही पदार्थ करून त्याची पेस्ट बनवून घ्यावी.
  • तयार पेस्ट काखेत लावून 2 मिनिटे मसाज करावा.
  • 10 ते 15 मिनिटे भाग स्वच्छ करून घ्यावा.
  • आठवड्यातून 2 वेळा हा उपाय केल्यास नक्कीच फरक जाणवू शकतो.

हेही वाचा – Deodorant VS Roll On: डिओडोरंट की रोल ऑन? दोन्हीपैकी त्वचेसाठी फायदेशीर काय?

Comments are closed.