Ladyfinger : या आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी चुकूनही खाऊ नयेत भेंडी

शरीर निरोगी राहण्यासाठी विविध भाज्यांचे सेवन केले जाते. कोणी भाज्या आवडीने खातो तर कोणी नाक मुरडत. याच भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे भेंडीची भाजी. अनेकांसाठी ही आवडीची भाजी असते. भरलेली भेंडी, कुरकुरीत फ्राय भेंडी अशा विविध प्रकारात भेंडीची भाजी बनवली जाते. यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आदी पोषकतत्वे असतात. विविध पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेली भेंडी आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असली तरी काही आजारात खाणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आपण जाणून घेऊयात, कोणत्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी भेंडी खाऊ नये.

मूत्रपिंड दगड –

भेंडीमध्ये ऑक्सीलेटचे प्रमाण भरपूर असते. या ऑक्सीलेटमुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोन आहे, अशांनी भेंडी खाऊ नये.

आतड्यांचे आजार –

भेंडी फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. पण, ज्या व्यक्ती आधीच पोटफुगी, गॅस आणि आतड्यांसंबंधी आजाराने त्रस्त आहेत, त्यांनी भेंडी खाऊ नये.

हेही वाचा – अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचा तुमच्या सेक्स हार्मोन्सवर होऊ शकतो परिणाम

सांधेदुखी –

गाउटच्या रुग्णांसाठी हाय ऑक्सलेट असलेले पदार्थ हानिकारक असतात. त्यामुळे सांधेदुखी असलेल्या व्यक्तीने भेंडी खाल्ल्यास गुडघ्यांमध्ये वेदना आणि सूज वाढते. त्यामुळे गाउटचे रुग्ण असाल तर त्याचे सेवन करू नये.

हाय ब्लड प्रेशर –

हाय ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी भेंडी खाऊ नये. कारण हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांनी पोटॅशियमची मात्रा अधिक असलेली भेंडी खाल्ल्यास समस्या आणखी वाढू शकते.

रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या व्यक्ती –

भेंडी हा व्हिटॅमिन के चा उत्तम स्त्रोत आहे. रक्त गोठवणाऱ्या प्रक्रियेसाठी व्हिटॅमिन के आवश्यक आहे. त्यामुळे रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तीने आहारात या व्हिटॅमिनचे प्रमाण मर्यादित ठेवणे गरजेचे असते. जास्त प्रमाणात भेंडी खाल्ल्याने रुग्णाच्या समस्येत वाढ होऊ शकते.

हेही वाचा – खुर्चीवर बसून काम करणाऱ्यांना या जीवघेण्या आजाराचा धोका

Comments are closed.