वडिलांपेक्षा आई लवकर वयस्कर का दिसते? संशोधनातून कारण समोर

अनेकदा असे दिसते की आई ही वडिलांपेक्षा लवकर वयस्कर विसायला लागते. मात्र तुम्हाला माहित आहे का? यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. याबाबत एक संशोधन करण्यात आले असून महिला लवकर वयस्कर दिसण्यामागे गर्भधारणा, हार्मोनल बदल अशी अनेक कारणे असू शकतात.

कोलंबिया विद्यापीठाच्या मेलमन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने याबाबत संशोधन केले आहे. याच संशोधनात असे आढळले की, प्रत्येक गर्भधारणेदरम्यान महिलांचे जैविक वय हे 2-3 महिन्यांनी वाढते.गर्भधारणेदरम्यान एखाद्या महिलेच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यामुळे रोकप्रतिकारक शक्ती कमी होते. तसेच वजन देखील झपाट्याने वाढते.

संशोधनात असेही म्हटले आहे की, गर्भधारणेमुळे महिलांना वयापेक्षा लवकर वृद्धत्व येऊ शकते. आता याचे कारण म्हणजे बाळ झाल्यानंतर कित्येक रात्री आईची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे ताण वाढतो आणि शरीरात कॉर्टिसोल हार्मोनमध्ये वाढ होते. यामुळे डीएनएचा बचाव करणारे टेलोमेरेसची संख्या घटू लागते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने होते. याशिवाय ज्या महिलांना अकाली रजोनिवृत्ती येते त्यांच्यात वयस्कर दिसण्याचा धोका असतो.

आता गर्भधारणेदरम्यान पुरुषांमध्ये शारीरिक आणि हार्मोनल बदल होत नाहीत. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिला लवकर वयस्कर दिसतात.

Comments are closed.