Navratri 2025: दांडिया नाईटसाठी प्रिंटेड ड्रेससह स्टाईल करा ट्रेंडिंग ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

तुम्हाला जर एखादा कॅज्युअल लूक स्टाईल करायचा असेल तर प्रिंटेड ड्रेस हे सर्वोत्तम पर्याय असतात. त्यातही यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातल्यास लूक आणखीनच खुलून दिसतो. हा लूक तुम्ही सण- उत्सव, कार्यक्रम किंवा अगदी ऑफिसमध्ये देखील सहज कॅरी करू शकता. त्यासाठी काही ट्रेंडिंग ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचे प्रकार तुमच्या मदतीला येऊ शकतात.

ऑक्सिडाइज्ड ब्रान सेट
जर तुम्ही ओपन प्रिंटेड कुर्ती घालणार असाल तर त्याच्यावर ऑक्सिडाइज्ड चोकर सेट घालू शकता. यामुळे तुमचा लूक एलिगंट दिसेल. या प्रकारच्या सेटसह तुम्हाला कानातले घालण्याची गरज नाही. हा सेट तुम्हाला बाजारात १०० ते २५० रुपयांना उपलब्ध असतो.

ऑक्सिडाइज्ड स्टोन वर्क सेट
जर तुम्हाला स्टोन वर्क ज्वेलरी ट्राय करायची असेल तर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सेट स्टाईल करू शकता. या प्रकारच्या सेटसोबत लाल आणि राखाडी रंगाचा ड्रेस शोभून दिसतो. त्यासोबत स्टड इयररिंग्ज स्टाईल करा. यामुळे तुमचा लूक खूप चांगला दिसेल. हे सेट तुम्हाला बाजारात १०० ते २५० रुपयांना मिळतील.

लांब मोत्याचे ऑक्सिडाइज्ड सेट
जर तुम्हाला मोत्याचा सेट घालायचा असेल पण तुम्ही ऑक्सिडाइज्ड मोत्याचे नेकलेस सेट स्टाईल करू शकता. यामध्ये चेन ऑक्सिडाइज्ड मोतींची असते तर पेंडंट ऑक्सिडाइज्ड प्रकारचे असते. यावर तुम्ही ऑक्सिडाइज्ड मोत्यांचे कानातले घालू शकता. बाजारात हा सेट तुम्हाला २०० ते २५० रुपयांना मिळतील.

Comments are closed.