ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर झोप येते? टिफिनमध्ये नक्की ठेवा हे 2 पदार्थ
ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर येणारी झोप अनेकांसाठी मोठं आव्हान ठरते. जेवणानंतर कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण जातं आणि शरीर जडसर वाटू लागतं. यावर उपाय म्हणून अनेक जण चहा कॉफीवर अवलंबून राहतात, पण हा फक्त तात्पुरता उपाय आहे. खरं तर, आपण जेवणात काय खातो यावरच आपल्या दुपारनंतरच्या ऊर्जा पातळीचा थेट परिणाम होतो. फिटनेस तज्ञांनी सांगितलेल्या दोन सोप्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास दुपारची झोप सहज टाळता येते आणि दिवसभर उत्साह टिकवता येतो. (lunch tips to avoid afternoon sleep)
कोणते आहेत हे दोन पदार्थ?
1. साजूक तूप
बर्याच जणांना वाटतं की तूप खाल्ल्याने शरीर जडसर होतं किंवा झोप येते. मात्र हे पूर्णपणे चुकीचं आहे. आहारात चमचाभर साजूक तूप घेतल्याने दुपारची झोप कमी होते. इतकंच नव्हे तर वजन कमी करणं, बद्धकोष्ठता, थायरॉईड, पिग्मेंटेशन यांसारख्या समस्यांवरही तुपाचा फायदा होतो. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन D आणि B-12 ची कमतरता आहे त्यांच्यासाठी तर तूप अधिक उपयुक्त आहे.
2. चटणी
दुसरा पदार्थ म्हणजे चटणी. नारळाची, कोथिंबिरीची, कढीपत्त्याची किंवा शेंगदाण्याची कोणतीही चटणी जेवणात घेतल्याने पचन सुधारतं आणि झोप कमी येते. चविष्ट चटणीमुळे जेवण हलकं आणि पचायला सोपं होतं.
याशिवाय लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
– दिवसाभरात पुरेसं पाणी प्या, हायड्रेटेड रहा.
– ऑफिसमध्ये तासभर बसल्यानंतर थोडं चालून या किंवा स्ट्रेचिंग करा.
– दुपारच्या जेवणात तेलकट, तुपकट आणि जड पदार्थ टाळा.
-जास्त जेवण न करता योग्य प्रमाणात आहार घ्या.
– भात कमी प्रमाणात खा, जेणेकरून सुस्ती येणार नाही.
Comments are closed.