घोस्टलाइटिंग म्हणजे काय? घोस्टिंगपेक्षाही वाईट मानला जातोय हा डेटिंग ट्रेंड
आजच्या डिजिटल युगात डेटिंगचे जग जलदगतीने बदलत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन लोक भेटतात, नाती जुळतात आणि तुटतातही. पण या नात्यांमध्ये आता एक नवा आणि धोकादायक ट्रेंड दिसत आहे घोस्टलाइटिंग. (ghostlighting dating trend)
घोस्टलाइटिंग म्हणजे काय?
घोस्टलाइटिंग हा दोन गोष्टींचा मिश्र प्रकार आहे
घोस्टिंग : म्हणजे एखाद्याने अचानक संपर्क तोडणे आणि गायब होणे.
गॅसलाइटिंग : म्हणजे समोरच्याला मानसिकदृष्ट्या गोंधळात टाकणे, त्याच्याच भावना चुकीच्या आहेत असं पटवून देणं.
या दोन्हींचा संगम म्हणजे घोस्टलाइटिंग. यात व्यक्ती आधी अचानक गायब होते आणि जेव्हा पुन्हा संपर्क करते, तेव्हा ती व्यक्ती म्हणते, “असं काही घडलंच नाही”, “तुलाच भास झाले”, किंवा “तूच जास्त विचार करतोयस/करतीयेस.”
हे कसं घडतं?
1.नातं छान सुरू असतं, समोरची व्यक्ती खूप काळजी घेते.
2.अचानक ती व्यक्ती गायब होते. कॉल्स, मेसेजेसला प्रतिसाद मिळत नाही.
3.तुम्ही कारण विचारलं तर ती व्यक्ती नकार देते आणि उलट तुम्हालाच शंका घेतल्याचा आरोप करते.
घोस्टलाइटिंग धोकादायक का आहे?
भावनिक गोंधळ निर्माण होतो तुम्ही स्वतःवरच शंका घ्यायला लागता.
मानसिक आरोग्यावर परिणाम, आत्मविश्वास कमी होतो, नैराश्य वाढतं.
नात्यातून बाहेर पडणं कठीण होतं. कारण, तुम्हाला सतत वाटत राहतं की कदाचित तुमचंच चुकलं.
घोस्टलाइटिंगची लक्षणं
1. व्यक्ती कधी खूप जवळ येते, तर कधी अचानक दूर जाते.
2. गंभीर चर्चा टाळते.
3. सतत तुम्हालाच “जास्त विचार करतोयस” असा आरोप करते.
4. तिच्या वागण्यामुळे तुम्ही स्वतःला चुकीचं समजू लागता.
5. गायब होण्याची कारणं नेहमीच अजब व बनावट असतात.
स्वतःला कसं वाचवावं?
समोरच्याच्या वागण्यात वारंवार बदल जाणवत असेल, तर सतर्क राहा.
स्वतःच्या भावनांना कमी लेखू नका.
वेळेवर नातं तोडणं हाच योग्य उपाय असू शकतो.
Comments are closed.