झुग थेरपी: जाडू की फिप्पी ते बांती हा! आपली मॅरेल मिथी

आपण अनेकदा ‘जादू की झप्पी’ हा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील डायलॉग अनेकांकडून ऐकतो. पण खरं सांगायचं तर मिठी म्हणजे फक्त प्रेमाचं प्रतीक नाही, तर ती शरीर आणि मनासाठी आरोग्यदायी ठरते. वैज्ञानिक संशोधनातूनही मिठीचे अनेक फायदे स्पष्ट झाले आहेत. (benefits of hug therapy)

हग थेरपी म्हणजे काय?

एखाद्याला आपुलकीने मिठी मारणं म्हणजे हग थेरपी. या थेरपीमुळे समोरच्या व्यक्तीला भावनिक आधार मिळतो. तणाव, एकटेपणा किंवा मानसिक दबावाखाली असलेल्या लोकांना यातून मोठा दिलासा मिळतो.

ऑक्सिटोसिन हार्मोन वाढतो

मिठी मारल्यानं शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा ‘लव्ह हार्मोन’ स्रवतो. यामुळे चिंता कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि मन प्रसन्न होतं.

रक्तदाब आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं

दररोज मिठी मारणं हे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतं. संशोधनानुसार, मिठीमुळे रक्तदाब आणि हार्ट रेट संतुलित राहतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

तणाव आणि नैराश्य दूर होतं

मिठी मारल्याने शरीरातील कोर्टिसोल हा तणाव निर्माण करणारा हार्मोन कमी होतो. त्यामुळे डिप्रेशनपासून आराम मिळतो आणि मानसिक आरोग्य सुधारतं.

मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना

पालकांकडून मिळणारी मिठी ही मुलांसाठी सर्वात मोठा आत्मविश्वासाचा स्रोत असतो. त्यामुळे त्यांच्यात प्रेम, सुरक्षिततेची भावना आणि जवळीक निर्माण होते.

आजारी लोकांवर होणारा परिणाम

आजारी व्यक्तीला दिलेली मिठी त्यांच्या मनोबलात भर घालते. सकारात्मक विचार वाढल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. दीर्घकाळ एकाकीपणा किंवा तणावात जगणाऱ्या रुग्णांसाठी मिठी ही औषधासारखी परिणामकारक ठरते.

Comments are closed.