वयाच्या तिशीनंतर मातृत्व कठीण का ठरतं? जाणून घ्या कारणं
आजच्या आधुनिक जीवनशैलीत अनेक महिला करिअर, शिक्षण किंवा इतर कारणांनी उशिरा लग्न करतात आणि मातृत्वाचा विचारदेखील उशिरा करतात. मात्र वयाच्या तिशीनंतर बाळाला जन्म देणं अनेकदा कठीण ठरतं. यामागे शारीरिक आणि हार्मोनल अशा दोन्ही कारणांचा मोठा वाटा आहे. (pregnancy difficulties after 30 reasons)
फर्टिलिटीचा प्रवास कसा असतो?
महिलांच्या शरीरातील फर्टिलिटीचा प्रवास हा जन्मापासूनच सुरू होतो. आईच्या गर्भात असतानाच मुलीच्या ओव्हरीजमध्ये लाखोंमध्ये अंड्यांची निर्मिती होते. मात्र जसजसं वय वाढतं, तसतसं अंड्यांची संख्या आणि त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. तिशीनंतर या घटकांचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो.
हार्मोनल समस्या आणि परिणाम
पीसीओडी आणि पीसीओएस: हार्मोनल असंतुलनामुळे पाळी अनियमित होते, वेदना आणि जास्त रक्तस्त्रावाचा त्रास होतो. यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते.
एंडोमेट्रिओसिस: गर्भाशयाच्या आतील अस्तराची जास्त वाढ होऊन वेदना व गर्भधारणेतील अडचणी निर्माण होतात.
वयामुळे होणारे बदल : तिशीनंतर अंड्यांची संख्या जलदगतीने कमी होत जाते. त्यामुळे गर्भधारणा कठीण होते.
आयव्हीएफ आणि मर्यादा
अनेक महिला गर्भधारणेसाठी IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) चा आधार घेतात. मात्र प्रत्येक महिलेचं शरीर वेगळं असल्याने या प्रक्रियेत यशस्वी होण्याची शाश्वती नसते. काहींमध्ये जास्त अंड्यांची निर्मिती होते (हायपर स्टिम्युलेशन), तर काहींमध्ये खूपच कमी अंड्यांची निर्मिती होते. त्यामुळे ट्रीटमेंटदरम्यान डोस आणि सायकल बदलावे लागतात. IVF मध्ये एका ठराविक सायकलमध्येच यश मिळेल याची हमी देता येत नाही.
काय काळजी घ्यावी?
– तिशीनंतर मातृत्वाचा विचार करत असल्यास नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे.
– शरीरातील बदल, पाळीतील अनियमितता आणि हार्मोनल समस्या याकडे दुर्लक्ष करू नये.
– जीवनशैलीत व्यायाम, संतुलित आहार आणि ताणतणावावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.
वयाच्या तिशीनंतर गर्भधारणा शक्य असली तरी ती आव्हानात्मक ठरते. वेळेवर तपासण्या आणि योग्य उपचार घेतल्यास मातृत्वाचा आनंद घेणं शक्य आहे. मात्र यासाठी महिलांनी आपली फर्टिलिटी आणि आरोग्याची जाणीव ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
Comments are closed.