Gardening Tips : स्किनकेअरसाठी उपयुक्त असणारी ही झाडे बाल्कनीत अवश्य लावा
झाडांमुळे आपले घर आणि आजूबाजूचा परिसर हिरवागार राहतो, हवा खेळती राहते, तसेच शुद्ध हवा आपल्याला मिळते. त्यामुळे घर कितीही लहान असले तरी कित्येकजण घराच्या खिडकीत किंवा बाल्कनी असेल तर तेथे विविध झाडे लावतात. पण, तुम्हाला हे माहिती आहे का? यातील काही झाडे अशी आहेत की, जी आपल्याला आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर अशी औषध म्हणून उपयोगी ठरतात. बाजारात मिळणाऱ्या महागड्या स्कीनकेअर प्रॉडक्टपेक्षा ही झाडे वापरून तुम्हाला त्वचेची काळजी घेता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात स्किनकेअरसाठी उपयुक्त असणारी कोणती झाडे आपण घरात लावायला हवीत.
कोरफड –
स्किन केअर प्रॉडक्टमध्ये कोरफडचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कोरफडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो, टॅनिंग दूर होते आणि चेहऱ्याला ग्लो देखील येतो. त्यामुळे बाल्कनीत किंवा खिडकीत तुम्ही किमान एक तरी कोरफडीचे रोप लावायला हवे.
हे ही वाचा – Sanitary Pads : वापरलेल्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट कशी लावायची?
तुळस –
तुळस आरोग्यदायी आहे हे आपल्याला माहीत आहे. त्वचेसाठी विविध फेसपॅक बनवताना तुळशीचा रस तुम्ही वापरू शकता. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.
कडुलिंब –
कडुलिंबाची पाने त्वचेसाठी वरदान असतात. यात ऍटी-बॅक्टेरियल आणि ऍटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही कडुलिंबाचे रोप कुंडीत लावायला हवे.
पुदिना –
तुळशीप्रमाणेच पुदिना आरोग्यासह त्वचेसाठी उपयुक्त आहे. पुदिना त्वचेला स्वच्छ करून नैसर्गिक थंडावा देतो. त्वचेसाठी पुदिन्यापासून विविध फेसमास्क तयार करता येतील. यासाठी पुदिन्याचे रोप छोट्याशा कुंडित नक्की लावा.
लिंबूग्रास –
कुंडीत लेमनग्रास लावता येईल. त्यात अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे त्वचेला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. लेमनग्रास वेगवेगळ्या प्रकारच्या फेस पॅकमध्ये वापरता येते आणि त्याचा रस थेट चेहऱ्यावर लावणे देखील फायदेशीर आहे.
हे ही वाचा – चक्क येथे दगड चालतात, डेथ व्हॅलीतील न उलगणारे रहस्य
Comments are closed.