Skincare Oil: मऊ आणि चमकदार त्वचेसाठी 30 दिवस वापरा हे तेल

निरोगी त्वचेसाठी काही घरगुती उपाय केल्यास प्रभावी ठरतात. दर वेळी बाजारातील महागडी स्किनकेअर उत्पादने वापरण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी काही उपाय करून मऊ आणि चमकदार त्वचा मिळवू शकता. तुम्ही त्वचेला नियमितपणे ३० दिवस पाच तेल लावले तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे तेल वापरू शकता. हे तेल चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

नारळ तेल
नारळ तेल आपल्या त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते. नारळ तेलात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स मुरुमे कमी करण्यास देखील मदत करू शकतात.

बडाम तेल
बदाम तेल चेहऱ्यासाठी फायदेशीर असते. ते व्हिटॅमिन ई ने समृद्ध असते ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते. बदाम तेल काळी वर्तुळे देखील कमी करते.

अ‍ॅव्होकाडो तेल
या तेलात व्हिटॅमिन ए, डी आणि ई असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात आणि त्वचेला पोषण देतात. हे तेल सूर्यप्रकाशाच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात.

ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करतात.

तेलाचे फायदे

  • तेले आपल्या त्वचेला पोषण देतात आणि त्वचा मऊ आणि चमकदार बनते.
  • काही तेलांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेवरील मुरुमे कमी करण्यास मदत करतात.
  • तेल त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करतात.

तेल कसे वापरावे:

  • रोज रात्री झोपण्यापूर्वी तेलाचा वापर करावा.
  • झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवा आणि तेलाने हलक्या हाताने मालिश करा.
  • तेल कमी प्रमाणात वापरावे; जास्त तेलाने त्वचा तेलकट होऊ शकते.
  • जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तेलाचा वापर टाळा.

Comments are closed.