फक्त दुबई नाही तर ‘या’ 7 देशांमध्ये मिळतं भारतापेक्षा स्वस्त सोनं

भारतामध्ये सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. 22 सप्टेंबर 2025 रोजी इंडियन बुलियन असोसिएशन (IBJA) नुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 1,14,422 रुपये प्रति तोळा होता. परंतु तुम्हाला माहीत आहे का की जगातील काही देशांमध्ये हेच सोनं भारतापेक्षा खूप स्वस्त दराने मिळतं? अनेकदा लोक स्वस्त सोनं म्हटलं की केवळ दुबईचं नाव घेतात, पण अशी आणखी काही देशं आहेत, जिथे सोन्याचे दर भारताच्या तुलनेत बरेच कमी आहेत. (top 10 countries to buy cheapest gold)

सोन्याची किंमत जागतिक बाजारपेठ, कर, आयात शुल्क, वेतन आणि मागणी यावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक देशात सोन्याचे दर वेगवेगळे असतात. चला जाणून घेऊया अशा 7 ठिकाणांविषयी, जिथे सोनं भारतापेक्षा स्वस्त मिळतं.

1) दुबई
दुबईला सोन्याची जागतिक राजधानी मानलं जातं. इथं 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम सुमारे 8718 रुपये आणि 22 कॅरेट सोनं सुमारे 7996 रुपये या दराने मिळतं.

२) इंडोनेशिया
इथं सोन्याचे दर गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम अंदाजे 8704 रुपये, तर 22 कॅरेट सोनं अंदाजे 7983 रुपये या दराने विकलं जातं.

3) स्वित्झर्लंड
सोन्याच्या व्यापाराचं एक पारदर्शक आणि सुरक्षित केंद्र. इथं 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम 8682 रुपये आणि 22 कॅरेट सोनं सुमारे 7963 रुपये या दराने मिळतं.

4) सिंगापूर
आशियातील महत्त्वाचं आर्थिक केंद्र असलेल्या सिंगापूरमध्येही सोने स्वस्त आहे. इथं 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम सुमारे 8667 रुपये, तर 22 कॅरेट सोनं 7949 रुपये या दराने विकलं जातं.

5) ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियामध्ये सोन्याची मागणी स्थिर असली तरी किमती कमी आहेत. 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम अंदाजे 8602 रुपये आणि 22 कॅरेट सोनं अंदाजे 7889 रुपये आहे.

6) अमेरिका
जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत सोन्याचे दर तुलनेने खूपच परवडणारे आहेत. अमेरिकेत 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम सुमारे 8586 रुपये आणि 22 कॅरेट सोनं 7874 रुपये आहे.

7) मलावी आणि कोलंबिया
आफ्रिकन देश मलावीमध्ये 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम सुमारे 9376 रुपयांना मिळतं, जे भारताच्या तुलनेत 10-15% स्वस्त आहे. तर दक्षिण अमेरिकन देश कोलंबियात हेच सोनं प्रति ग्रॅम 9500 ते 10000 रुपयांदरम्यान मिळतं, जे भारतापेक्षा 8-12% स्वस्त आहे.

भारतात सोन्याचे दर जास्त असले तरी जगातील अनेक देशांमध्ये हे दर तुलनेने कमी आहेत. यामध्ये दुबई, इंडोनेशिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मलावी आणि कोलंबिया या देशांचा समावेश होतो. परंतु लक्षात ठेवा, सोन्याच्या किंमती वेळोवेळी बदलत असतात. त्यामुळे खरेदी करण्याआधी दरांची पडताळणी करणं आवश्यक आहे.

Comments are closed.