पांडवानी एका रात्रीत बांधले होते हे मंदिर, वाचा काय आहे मंदिराची कथा

‘एकविरा आई तु डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी.. ‘ हे गाणं ऐकताच डोळ्यांसमोर उभे राहतात ते आग्री-कोळी बांधव.. याचं आग्री-कोळ्यांची देवी म्हणजे कार्ल्यात वसलेली एकविरा देवी.. मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणावळा येथील आई एकवीरा देवी मंदिराला नवरात्रीत नक्कीच भेट द्यायला हवी. हे मंदिर महाभारत काळातील आहे. असे म्हटले जाते की, पांडवांनी त्यांच्या वनवासात फक्त एका रात्रीत हे मंदिर बांधले होते. चला तर मग जाणून घेऊयात या मंदिरांची खास वैशिष्टे

आग्रा-कोळ्यांचे देवस्थान

लोणावळा हे नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे कार्ला लेणी आहेत, जिथे आग्रा-कोळ्यांचे देवस्थान असलेली एकवीरा देवीचे मंदिर आहे. या मंदिराची खासियत म्हणजे ज्या गुहांच्या शेजारी एकवीरा देवीची पूजा केली जाते, त्या गुहा एकेकाळी बौद्ध धर्माचे केंद्र मानल्या जात होत्या.

हे ही वाचा – Renuka Mata Temple : केडगावची रेणुकामाता – अहिल्यानगर

पांडवांनी एका रात्रीत बांधले देवीचे मंदिर

महाभारताच्या कथेनुसार, पांडव वनवासात पोहचताच सर्व पांडव बंधू आपल्यावर झालेल्या घोर अन्यायबद्दल बोलू लागले. त्यांचे हे शब्द ऐकून डोंगरात विराजमान झालेल्या एकविरा देवीचे मन हेलावले आणि तिने त्यांना संकटातून बाहेर पडण्यास मदत केली. देवी म्हणाली, हे पांडवपुत्रांनो, मी तुमचे भाग्य बदलू शकत नाही कारण तुमचा जन्म एका महान कार्यासाठी झाला आहे. पण, मी तुम्हाला या दिवसांतून बाहेर पडण्यासाठी नककीच मदत करू शकते.

देवीचे हे शब्द ऐकताच पांडव देवीपुढे नतमस्तक झाले. त्यानंतर देवीने पांडवांची परीक्षा घेतली आणि म्हटले की जर वनवास सोपा करायचा असेल तर तुम्हाला देवीचे मंदिर बांधावे लागेल, पण या मंदिराचे बांधकाम एका रात्रीत पूर्ण करावे लागेल. एकवीरा आईचे आव्हान स्वीकारून पांडवांनी रात्रभर जागे राहून डोंगराच्या मधोमध हे मंदिर बांधले आहे. मंदिर बांधताच पांडवांनी देवीने हात जोडून तिला मंदिरात येण्यास सांगितले. पांडवांची हाक ऐकून एकविरा देवीने पुन्हा दर्शन दिले आणि वनवासात त्यांना कोणीही ओळखणार नाही, असे वरदान दिले.

एकविरा देवी मंदिरात कसे जायचे ?

एकविरा नेत्र मंदिर पुण्यापासून 60 किमी आणि मुंबईपासून 100 किमी अंतरावर आहे. त्याचबरोबर लोणावळ्यापासून या मंदिराचे अंतर 10 किलोमीटर आहे.

हे ही वाचा – Durga Temple : देशातील या मंदिरात असतो नवरात्रीचा अनोखा उत्सव

Comments are closed.