प्रेग्नेसीमध्ये ही औषधी घेणे टाळा, आईसह बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

प्रेग्नेसीमध्ये स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे या दिवसात आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व पथ्यपाणी करून औषधे घेणे दोघांच्याही आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. औषधांचा योग्य वापर आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. तथापि, प्रत्येक औषध बाळासाठी योग्य असेलच असे नाही. काही औषधे ही गर्भाशयातील बाळाच्या विकासावर परिणाम करू शकतात. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात प्रेग्नेसीमध्ये कोणती औषधे घेणे टाळायला हवे.

चुकीची औषधे घेतल्याने काय होते?

गर्भधारणेदरम्यान चुकीची औषधे घेतल्याने आई आणि बाळ दोघांनाही गंभीर धोका उत्पन्न होतो. यात जन्मजात दोष, ज्यामध्ये बाळाचे हृदय, अवयव, मेंदू, पाठीच्या कण्यातील समस्या यांचा समावेश असतो. काही केसेसेमध्ये असे आढळले आहे की, गर्भपात होतो. विशेषत: प्रेग्नेसीच्या सुरूवातीच्या महिन्यात.

हे ही वाचा – तुम्हीही मोबाईल टॉयलेटमधे घेऊन जाता? मग आताच सावध व्हा

कोणती औषधे टाळाल?

पॅरासिटामॉल, आयब्रुप्रोफेन आणि काही ऍटी-बायोटिक्स जे आपण साध्या तापात वापरतो. तज्ज्ञांच्या मते, प्रेग्नेसीमध्ये डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणतीच औषधे घेऊ नयेत. अस्पिरीन, रक्त पातळ करणारी औषधे, काही हर्बल आणि औव्हर दि काऊंट औषधे घेणे टाळावेत.

हे महत्त्वाचे –

  • डॉक्टराच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे या दिवसात घेऊ नये.
  • औषधांचा डोस आणि वेळ योग्यरित्या पाळा.
  • कोणतेही नवीन औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • औषधे घेताना लेबल आणि एक्सपायरी डेट तपासा.

हे ही वाचा – गर्भवती महिलांनी कसे झोपावे? बाळाच्या वाढीसाठी झोपण्याची ही पद्धत योग्य

Comments are closed.