Fruit Leaf Benefits : या पानांचा रस पोटाचे आरोग्य ठेवेल निरोगी, पिण्यास आजच करा सुरूवात
हल्ली धावपळीच्या रुटीनमुळे पोटाच्या समस्या जाणवणे सामान्य झाले आहे. यात गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अपचन आणि पोटदुखी यासारख्या तक्रारींचा समावेश असतो. पोटाच्या या त्रासापासून सुटका व्हावी यासाठी विविध उपचार केले जातात. पण, अनेकदा यावर कायमचा तोडगा निघत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही नैसर्गिक उपाय करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा एका फळांच्या पानांचा रसाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.
पपईच्या पानांचा रस –
पपईची पाने उकळून तयार केलेल्या पाण्याला पपईच्या पानांचा अर्क किंवा रस म्हणतात. हा रस चवीला कडू असतो. पण, त्याचे फायदे शरीराला विविध प्रकारे होतात.
पपईच्या पानांचा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर असतो?
- पपई जशी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे पपईची पाने देखील शरीरासाठी लाभदायी असतात. यातील विविध पोषकतत्वे आतड्यांची सफाई करून पोटातील गॅस बाहेर काढतात.
- पपईच्या पानांचे पाणी आम्लपित्त आणि अपचनावर रामबाण उपाय आहे. हे पोटातील आम्ल संतुलित राखते आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला जळजळ जाणवत नाही.
- पपईचे पाणी नियमितपणे प्यायल्याने यकृत स्वच्छ होते आणि त्याचे कार्य सुधारते.
हेही वाचा – Health Tips: शिंक आल्यावर खरंच जीव जाऊ शकतो का? जाणून घ्या कारण
- फॅटी लिव्हरच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी पपईच्या पानांचा रस दररोज पिणे फायदेशीर ठरेल.
- डेंग्यू झाल्यास पपईच्या पानांचे पाणी प्यावे, कारण या पाण्यामुळे प्लेटलेट्सची संख्या वाढते. पण, हे पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
- पपईच्या पानांमधील गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे वायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी पपईच्या पानांचा रस प्यावा.
रस कसा बनवावा?
- 4 ते 5 पपईची पाने घ्यावीत.
- पपईची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत.
- पानांचे लहान लहान तुकडे करा.
- पानांचे हे तुकडे कोमट पाण्यात उकळवून घ्यावीत.
- पाणी अर्ध्यावर आल्यावर गॅस बंद करा आणि पाणी थंड करून घ्यावे.
- दररोज हे अर्धा ग्लास पाणी प्यावे.
हे ही वाचा – तुम्हीही मोबाईल टॉयलेटमधे घेऊन जाता? मग आताच सावध व्हा
Comments are closed.