गालावरचे ओपन पोअर्स कमी करणारे सोपे उपाय

गालावरचे ओपन पोअर्स ही हल्ली अनेकांना जाणवणारी समस्या आहे. ओपन पोअर्स म्हणजे त्वचेवरील रोमछिद्रे. चेहऱ्यावरील ही रोमछिद्रे अनेकदा खूप जास्त दिसून येतात. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसतात. हळूहळू या ओपन पोअर्समध्ये तेल, घाण साचू लागते. त्यात चुकीच्या पद्धतीने त्वचेची स्वच्छता करणे, वारंवार चेहऱ्याला हात लावणे, चुकीचा आहार, हार्मोनल बदल यामुळे या पोअर्समध्ये वाढ होत जाते. अशा परिस्थितीत आज आपण जाणून घेऊयात गालावरचे ओपन पोअर्स कमी करणारे घरगुती उपाय,

बर्फ

  • एखाद्या कापडात बर्फाचे तुकडे गुंडाळा आणि हलक्या हातांनी गालांवर फिरवा.
  • यामुळे पोअर्स आकुंचन पावतात आणि त्यांची सूज कमी होते.

मध आणि लिंबाचा फेस पॅक –

  • एक चमचा मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब एकत्र करा.
  • तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
  • लिंबाचा रस नैसर्गिकरित्या हे पोअर्स स्वच्छ करेल आणि मध त्वचा मऊ बनवेल.

हेही वाचा – Women Hygiene : इनरवेअर वापरण्याचे हे नियम पाळा, युरिन इन्फेक्शन टाळा

कोअरपॉन्ट जेल –

  • कोरफडीचे जेल चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.
  • कोरफडीचा गर त्वचेतील तेल कमी करते आणि त्वचेला शांत करते, ज्यामुळे पोअर्सची समस्या कमी होईल.

गुलाबजल आणि चंदन पावडर –

  • 1 चमचा गुलाबजल आणि 1 चमचा चंदन पावडरची पेस्ट तयार करून घ्यावी.
  • ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर धुवून घ्यावी.
  • यामुळे त्वचा मऊ, तजेलदार होते आणि ओपन पोअर्स कमी होण्यास सुरूवात होईल.

हेही वाचा  – हेल्मेटमुळे होऊ शकते केसगळती; पण कारण काय? जाणून घ्या सत्य

Comments are closed.