Dussehra : देशभरात कुठे, कसा साजरा होतो दसरा?

नवरात्रीचा जल्लोष, उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे. नऊ दिवस देवीची नऊ रुपे, नऊ रंग यामुळे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी दसरा साजरा केला जातो, ज्याला विजयादशमी असे देखील म्हटले जाते. दसरा हा वाईटावर विजयाचे प्रतीक आहे. देशभरात विविध पद्धतीने दसरा साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो.

दिल्ली –

रामलीला आणि रावणदहन

दिल्लीत दसऱ्याची सुरूवात रामलीलाने होते. यात भगवान रामाची कथा सांगितली जाते. या उत्सवात रावण, मेघनाथ आणि कुंभकर्ण यांच्या भव्य पुतळ्यांचे दहन केले जाते. दिल्लीतील लाल किल्ला, द्वारका आणि रामलीला मैदानासह प्रमुख ठिकाणी रावण दहन केले जाते.

हे ही वाचा – Navratri Kanyapujan: नवरात्रीत कन्यापूजन करताना या वस्तू देणे ठरते शुभ

कोलकाता –

दुर्गा पूजा आणि सिंदूर खेळ

कोलकत्त्यात दुर्गा पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. यासाठी शहरात मोठमोठे मंडप उभारले जातात. दसऱ्याच्या दिवशी सिंदूर खेळ खेळला जातो, ज्यात महिला एकमेकींना सिंदूर लावतात.

कुल्लू, हिमाचल प्रदेश –

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे दसरा विशेष पद्धतीने साजरा करण्यात येतो. हा उत्सव रघुनाथजींच्या पूजेपासून सुरू होतो, ज्यात आजूबाजूच्या भागातून देवतांच्या पालख्या आणल्या जातात. पालख्या आणल्यानंतर स्थानिक कलाकार नृत्य आणि संगीत सादर करतात.

म्हैसूर, कर्नाटक

दसरा उत्सव आणि जम्बो राईड

म्हैसूरचा दसरा उत्सव कर्नाटक हा राज्यातील एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या काळात, म्हैसूर पॅलेस चमकदार रोषणाईने सजवला जातो. “जंबो सावरी” नावाच्या ऐतिहासिक मिरवणुकीत हत्तीची स्वारी, बँड आणि पारंपारिक नृत्यांचा समावेश असतो. हा उत्सव दहा दिवस चालतो आणि राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करतो.

गुजरात –

गरबा आणि दांडिया नृत्य

गुजरातमध्ये, दसरा हा “नवरात्र” म्हणून साजरा केला जातो, जो गरबा आणि दांडिया नृत्यांचा नऊ दिवसांचा उत्सव आहे. लोक पारंपारिक पोशाखात या नृत्यांचा आनंद घेतात. हा उत्सव अहमदाबादमध्ये विशेषतः लोकप्रिय आहे,

छत्तीसगड –

बस्तर दसरा

छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशात, दसरा उत्सव ७५ दिवस चालतो, ज्यामुळे तो भारतातील सर्वात मोठा दसरा उत्सव मानला जातो. हा उत्सव देवी दंतेश्वरीच्या पूजेपासून सुरू होतो आणि त्यात ‘पाटा यात्रा’, ‘निशा यात्रा’ आणि ‘मुरिया दरबार’ सारख्या आदिवासी परंपरांचा समावेश आहे.

हेही वाचा – Chhinnamastika Temple: शीर नसलेल्या देवीची मूर्ती असलेले छिन्नमस्ता मंदिर

Comments are closed.