मासिक पाळी येताच झाडाशी लावतात लग्न, भारतात पाळली जाते विचित्र प्रथा
भारतात अजूनही अनेक प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात. काही ठिकाणी मुलींना मासिक पाळी आल्यावर वेगवेगळ्या प्रथा पाळल्या जातात. पण भारतात एक असे ठिकाण आहे जिथे मुलींना मासिक पाळी आल्यावर एक विचित्र प्रथा पाळली जाते. ती म्हणजे मुलींना मासिक पाळी आल्यावर त्यांचे लग्न झाडाशी लावले जाते.
आसामच्या विचित्र पद्धती
ही परंपरा आसामच्या काही भागात पाळली जाते. जेव्हा एखाद्या मुलीला पहिली पाळी येते तेव्हा तिला चार दिवस बाजूला बसवले जाते. त्यानंतर तिचे लग्न केळीच्या झाडाशी केले जाते. विशेष म्हणजे मोठ्या थाटामाटात हे लग्न केले जाते. या प्रथेला ”टोलिनी विवाह” असे म्हंटले जाते. ही परंपरा आसाममधील बोगाईगाव जिल्ह्यातील सोलमारी इथे आजही पाळली जाते.
हे लग्न करताना मोठा उत्सव आयोजित करण्यात येतो, ज्यामध्ये नृत्य आणि संगीत देखील असते. मुलीचे संपूर्ण कुटुंब देखील या उत्सवात सहभागी होते. असे म्हटले जाते की या काळात मुलीला फक्त फळे खायला दिली जातात. मग लग्न झाल्यावर ती पुन्हा सामान्य जीवन जगते.
मासिक पाळीच्या काळात होणारे हे लग्न मुलीचे पहिले लग्न मानले जाते. मग जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा योग्य वर शोधून तिचे लग्न लावले जाते. ही एक परंपरा आहे जी अनेक वर्षांपासून चालत आली आहे आणि आजही पाळली जात आहे.
Comments are closed.