पाळीव कुत्र्यांमुळे रेबीजचा धोका? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

सर्वात निष्ठावंत प्राणी म्हणून कुत्र्याकडे पाहिले जाते. हल्ली बरेचजण घरात कुत्रे पाळतात. अगदी घरातल्या सदस्याप्रमाणे त्याची काळजी घेतली जाते. पण, तुम्हाला हे माहिती आहे का की भटक्या कुत्र्याप्रमाणे पाळीव कुत्रे तुमच्या मृत्युचे कारण बनू शकतात. कुत्रा चावल्याने रेबीज होण्याचा धोका असतो. रेबीज झाल्यावर वेळेवर उपाय केले नाहीत मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे रेबीज एक अतिशय गंभीर समस्या सांगितली जाते. रेबीजविषयी जनजागृती होण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. या दिवशी रेबीजबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे आणि रेबीज प्रतिबंधक प्रयत्नांना गती देण्याचे कार्य केले जाते.

अनेक लोकांचा असा समज असतो की, रेबीज फक्त भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे पसरतो. पण, हे पूर्ण सत्य नाही. पाळीव कुत्र्यामुळे रेबीज होऊ शकतो. पाळीव कुत्र्याचे लसीकरण केल्यानंतरही रेबीजचा धोका असतो. हे टाळण्यासाठी काय करता येईल.

हेही वाचा – दातांसाठी सर्वात घातक काय बिस्कीट की चॉकलेट? शाहरुख खानच्या डेंटिस्टने केला खुलासा

पाळीव कुत्र्यांमुळे रेबीजचा धोका

अनेकांना असे वाटते की, कुत्रा चावल्याने रेबीज होतो. पण, कुत्रा चाटल्यानेही याचा धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात भटक्या कुत्र्यांपेक्षा पाळीव कुत्रा चावल्याने मृत्यु झाला आहे. त्यामुळे घरातील पाळीव कुत्र्याचे लसीकरण करणे आवश्यक आहे आणि काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

रेबीजची लक्षणे –

ताप, डोकेदुखी, मळमळ, भिती वाटणे, एन्झायटी, गिळण्यास त्रास, हवा – पाण्याची भिती, निद्रानाश आदी

टाळण्यासाठी काय करावे?

जर तुम्हाला कुत्रा किंवा कोणताही संक्रमित प्राणी चावला तसेच कुत्र्याच्या लाळेच्या संपर्कात तुम्ही आलात तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये. जेव्हा जेव्हा कुत्रा तुम्हाला चावतो किंवा ओरखडे करतो तेव्हा चावलेल्या जागेला किमान 15 मिनिटे साबण आणि पाण्याने पूर्णपणे धुवून घ्यावे. तसेच ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन रेबीज लसीकरण करावे.

लसीकरणानंतरही धोका का असतो?

लसीकरण चुकीच्या पद्धतीने होणे – चुकीचे डोस दिल्यास किंवा लसीकरण वेळेवर न केल्यास रेबीजचा धोका वाढू शकतो.

लसीचा परिणाम न होणे – क्वचित प्रसंगी, रेबीज विषाणू शरीरात इतक्या वेगाने पसरतो की लस त्याचा परिणाम करेपर्यंत विषाणू मेंदूपर्यंत पोहोचतो.

लसीकरणानंतरही रेबीज होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे, परंतु काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये असे घडल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा – गरोदर महिलांसाठी पॅरासिटामॉल धोकादायक? डोनाल्ड ट्रम्प यांचा महिलांना गजब सल्ला

Comments are closed.