पडद्यांवरील धूळ झटक्यात होईल साफ, या टिप्स करतील मदत

घरातील दरवाजे आणि खिडक्यांवर पडदे असणे ही सामान्य बाब आहे. आता दसरा- दिवाळी असे सण येणार आहेत. त्यामुळे घरोघरी साफसाईची मोहीम सुरू झाली असेल. अशातच घरातील पडदे हे आपण हमखास धुवायला काढतो. यंदा घरातील पडदे धुण्यासाठी काही टिप्स तुमच्या मदतीला येऊ शकतात. यामुळे पडद्यांचा रंग जाणार नाही. तसेच तेझटक्यात स्वच्छही होतील.

  • पडदे पाण्यात भिजवण्यापूर्वी झटकून घ्यावेत. त्यामुळे त्यावरील धूळ कमी होईल.
  • पडदे धुण्यापूर्वी रात्रभर साबण्याच्या पाण्यात भिजत ठेवावे. यामुळे धूळ पटकन निघून जाते.
  • पडदे धुताना रंग जाऊ नये यासाठी पाण्यात चमचाभर मीठ टाकावे त्यात पडदे भिजवा.
  • याशिवाय जर तुम्हाला पडदे न धुताच साफ करायचे असतील, तर स्टीम क्लिनिंग हा एक उत्तम उपाय आहे. आधी
  • जितकी शक्य असेल धूळ काढा आणि नंतर स्टीमरचा उपयोग करून पडदे स्वच्छ करा.
  • पडदे स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर देखील वापरू शकता. जर तुम्ही पडदे धुणार नसाल तर व्हॅक्यूम क्लिनरने ते
  • हळूवारपणे स्वच्छ करा. या पद्धतीमुळे पडद्यांवर साचलेली धूळ आणि घाण निघून जाते.
  • पडद्यांवर विविध प्रकारचे डाग असतील तर हे डाग हटवण्यासाठी व्हिनेगर अत्यंत उपयुक्त आहे. पडदे वॉशिंग
  • मशीनमध्ये ठेवा. त्यात थोडे व्हाईट व्हिनेगर आणि हलकीशी सामान्य डिटर्जंट पावडर टाका.

सुकवण्याची पद्धत:
धुतल्यानंतर नेहमी थेट सूर्यप्रकाशात पडदे वाळवू नका. पडदे सावलीत किंवा खूप मंद सूर्यप्रकाशात ठेवा. थेट सूर्यप्रकाशात ते सुकवल्याने त्यांचा रंग फिकट होऊ शकतो.

हेही महत्त्वाचे:
पडदे फक्त घराच्या सौंदर्यासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही महत्त्वाचे असतात. घान पडदे, पायदान व चादर यांमुळे घरातील हवेत धूळ आणि जंतू जमा होतात आणि त्वचेसाठी ते हानिकारक ठरू शकतात. हे विशेषतः लहान मुले, वृद्ध किंवा श्वसनाच्या समस्यांमध्ये असणाऱ्यांसाठी अधिक जोखमीचे असते. त्यामुळे वेळोवेळी पडदे स्वच्छ ठेवणे आणि त्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे.

Comments are closed.